फोटो सौजन्य - Social Media
आपल्या शरीराचे प्रत्येक भाग आपली स्थिती बदलत असतात. या स्थितींना हलक्यात घेणे फार कठीण ठरू शकते. कारण हे भाग स्थिती तेव्हाच बडकतंत्र, जेव्हा आपल्या शरीराच्या आतमध्ये काही बदल होते. आता हे बदल चांगले कि वाईट? याचे उत्तर त्या स्थितीवरून लावता येते. बऱ्याचदा जर डोळे पिवळसर झाले तसेच शरीराच्या काही भागांमध्ये पिवळेपणा आला याचा अर्थ असा कि आपल्याला कावीळ होत आहे. त्यानुसार आपण हालचाल करायला सुरुवात करतो. फक्त डोळेच नव्हे तर हात, नसे तसेच नखांपासून ही लक्षणे ओळखता येतात. माणसाचे ओठही अशा खुणा देऊन माणसांना जागृत करतात. ओठांच्या स्थितीनुसार आपण निरोगी आहोत का रुग्ण याचा अंदाज बांधता येतो.
हे देखील वाचा : लग्न ठरलंय? मग आपल्या होणाऱ्या लाइफ पार्टनरला ‘हे’ प्रश्न नक्की विचारा
पूर्वीच्या काळी जास्त रुग्णालय तसेच गावोगावी डॉक्टर्स नसायचे. त्यावेळी अशाच पद्धती वापरून आपण किती निरोगी आहोत? का आपल्याला कोणत्या आजाराची लागण झाली आहे? याचा अंदाज लावता यायचा. ती वैद्य परंपरा आजकाल काही नुस्क्यांच्या द्वारे जपली जात आहे. शरीरातील भाग जर काही खुणा देत असेल तर त्यावरून आजाराची खात्री करणे ही वैद्य कलाही या वैद्य परंपरेचा भाग आहे. चला तर मग जाणून घेऊयात कि तुमचे ओठ तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल काय आणि कसे सांगतात.
बऱ्याचदा आपापल्या ओठांवर सुजन येते. आपण त्याला साधी गोष्ट समजून सुर्लक्ष करतो. परंतु, ओठांवर आलेली सुजन तुम्हाला एखादी एलर्जी झाल्याचे संकेत देते. तसेच तुम्हाला एखाद्या खाद्यपदार्थामुळे पोटामध्ये इन्फेक्शन झाले असल्याचे या संकेताद्वारे कळून येते. जर तुमचे ओठ सतत सुकत असतील तर याचा अर्थ असा आहे कि तुमच्या शरीरामध्ये पाण्याची फार कमी आहे. कधी कधी शरीराच्या आतमध्ये ताप आल्यामुळे आपले ओठ सुकतात.
हे देखील वाचा : PCOS चे निदान कळण्यासाठी कोणती ब्लड टेस्ट करावी, तज्ज्ञांचा खुलासा
ओठांचा रंग पिवळसर होण्यामागे मोठे कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असणे. तसेच ओठांचा पिवळा रंग ऍनिमियाचे संकेत देतो. ओठांचे पिवळे किंवा सफेद पडणे शरीरातील आयरनच्या कमीला उद्देश देते. ओठ निळसर पडणे म्हणजे सियानोसिसचा त्रास असण्याची दाट शक्यता आहे.