
मायग्रेनवर आयुर्वेदिक उपाय
जीवनशैलीतील बदल, अपुरी झोप, सतत बाहेरचे पदार्थ खाणे इत्यादी सर्व गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. अपुऱ्या झोपेमुळे सतत डोकेदुखीची समस्या उद्भवते. डोकं दुखायला लागल्यानंतर काहीच समजत नाही. डोकेदुखीचा त्रास सुरु झाल्यानंतर कितीही गोळ्या खाल्यातरीसुद्धा डोकं दुखायचं थांबत नाही. डोकं दुखायला लागल्यानंतर अनेक लोक या समस्येकडे दुर्लक्ष करतात. पण याचं छोट्या आजारांचे मोठ्या आजारांमध्ये रूपांतर होते. मायग्रेनचा त्रास सुरु झाल्यानंतर तीव्र डोके दुखी होण्यास सुरुवात होते. यामुळे तीव्र डोकेदुखी, डोळ्यात जळजळ होणे, उलट्या होणे, मानेच्या शिरा आणि नसा दुखणे इत्यादी अनेक समस्या जाणवतात. त्यामुळे मायग्रेनच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे तुमची डोकेदुखी कायमची बरी होईल.(फोटो सौजन्य-istock)
पंचकर्म थेरेपी केल्यामुळे डोके दुखीचा त्रास कमी होऊन आराम मिळेल. पंचकर्म थेरेपी करताना पूर्वीच्या काळातील औषध उपचार पद्धतीचा वापर केला जातो.जुन्या काळातील अनेक औषधी वनस्पतींच्या मदतीने ही थेरेपी केली जाते. यामध्ये वामन, विरेचन, नस्य, अनुवासन वस्ती, निरुह वस्ती इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश आहे. या थेरपीमध्ये संपूर्ण शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते. थेरेपीमधून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकले जातात. ही थेरेपी केल्यानंतर हळूहळू शरीरातील वेदना कमी होतात.
हे देखील वाचा: घोरणं वाटतंय सामान्य? घशाच्या कॅन्सरचा धोका घोरणाऱ्यांना अधिक, काय सांगतो अभ्यास
मायग्रेनवर आयुर्वेदिक उपाय
मायग्रेनच्या आजारापासून आराम मिळवण्यासाठी सकाळी उठल्यावर नियमित योगासने करावीत. योगासने केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. योगा केल्यानंतर शरीरात लगेच कोणतेही बदल दिसून येत नाही. पण सातत्याने योगासने केल्यानंतर शरीरातील बदल होण्यास सुरुवात होते. मायग्रेनचा समस्येपासून आराम मिळवण्यासाठी पश्चिमोत्तनासन, सेतुबंधासन, अधो मुख स्वानासन, मार्जरियासन आणि बालासन ही आसन करावीत. याचा मेंदूला सुद्धा फायदा होतो.
हे देखील वाचा: जान्हवी किल्लेकरच्या रागामुळे बिग बॉसच्या घरात कल्ला, रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा
सतत डोके दुखायला लागल्यानंतर अनेकदा आपण डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या औषध घेतो. पण याचा फारकाळ शरीरावर परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे मायग्रेनचा समस्येपासून आराम मिळवण्यासाठी पथ्यादी काढ्याचे सेवन करावे. या काढ्यामध्ये वेगवेगळ्या औषधी वनस्पती असतात, ज्यांच्यापासून पथ्यादी काढा बनवला जातो. त्यामुळे मायग्रेनचा त्रास होत असलेल्या व्यक्तींनी पथ्यादी काढ्याचे सेवन करावे.