घोरण्यामुळे उद्भवू शकतो घशाचा कर्करोग
घोरणे ही एक सामान्य समस्या मानली जाते, परंतु सतत घोरणे हे गंभीर आजाराचे लक्षणदेखील असू शकते? अनेक संशोधनांनुसार असे सांगण्यात आले आहे की, सतत आणि जोरात घोरणे हे घशाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीतरी घोरण्याच्या समस्येने त्रस्त असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे केवळ झोपेच्या गुणवत्तेवरच परिणाम करत नाही तर आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करू शकते.
घोरणे म्हणजे अनेकदा झोपेच्या दरम्यान श्वासोच्छवासात अडथळा निर्माण झाल्यामुळे घडणारी क्रिया, ज्याला स्लीप एपनिया म्हणतात. झोपेच्या वेळी एखाद्या व्यक्तीचा वायुमार्ग अरुंद होतो किंवा अवरोधित होतो, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो तेव्हा ही स्थिती उद्भवते. या समस्येकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास घसा आणि श्वसनमार्गाच्या पेशींना हानी पोहोचते, जी कालांतराने कर्करोगाचे रूप धारण करू शकते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने केलेल्या अभ्यासानुसार घोरणे ही समस्या कर्करोगात बदलू शकते. (फोटो सौजन्य – iStock)
घोरण्याची कारणे
लठ्ठपणा: जास्त वजन हे घोरण्याचे एक प्रमुख कारण आहे, कारण घसा आणि मानेभोवती चरबी श्वासोच्छवासाची नळी अरुंद करते.
अॅलर्जी: नाक किंवा घशात सूज आणि बलगम जमा झाल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, ज्यामुळे घोरण्याची क्रिया होते
मद्यपान आणि धुम्रपान: मद्यपान आणि धुम्रपानामुळे घशाचे स्नायू शिथिल होतात, ज्यामुळे वायुमार्ग अरुंद होतो आणि घोरणे सुरू होते
झोपण्याची स्थिती: पाठीवर झोपल्याने वाऱ्याच्या नळीवर दाब वाढतो, ज्यामुळे घोरण्याची शक्यता वाढते
हेदेखील वाचा – Liver Cancer झाल्यास शरीर देतं ‘हे’ संकेत, न ओळखता आल्यास वाढू शकतात समस्या
घोरण्यावरील सोपे उपाय
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.






