
बाळाला जन्म दिल्यावर स्वतःची काळजी घेत नाहीत महिला (फोटो सौजन्य - iStock)
सतत आपल्या बाळाची काळजी घेणे, झोपेचा अभाव, शारीरिक थकवा आणि ‘’आता मला काहीच त्रास होत नाही” या भावनेमुळे महिलांकडून नियमित तपासणीस टाळाटाळ केली पुढे जाते. मात्र भविष्यात हे गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकते, असा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे.
का गरजेची आहे आरोग्य तपासणी?
तज्ज्ञांच्या मते, गर्भाशय मुखाचा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात वाढू शकतो. प्रसूतीनंतर शरीरात होणारे हार्मोनल बदल, जंतुसंसर्गाचा वाढलेला धोका आणि जुन्या जखमा लक्षात घेता ही तपासणी अत्यंत महत्त्वाची ठरते.
प्रसूतीनंतर बहुतांश महिला त्यांचे संपूर्ण लक्ष हे त्यांच्या बाळाच्या आरोग्यावर केंद्रित करतात, पण स्वतःच्या तपासण्यांकडे मात्र पाठ फिरवतात. गर्भाशय मुखाची तपासणी ही वेदनारहित, सोपी आणि अवघ्या काही मिनिटांत होणारी प्रक्रिया आहे. प्रसुतीनंतर 6 ते 12 आठवड्यांत ही तपासणी केल्यास भविष्यातील गंभीर आजार टाळता येऊ शकतात अशी प्रतिक्रिया डॉ. पायल नारंग, प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ, मदरहुड हॉस्पिटल, लुल्लानगर, पुणे यांनी व्यक्त केली.
ही आहेत तपासणी टाळण्यामागची कारणं
तज्ज्ञांच्या मते, बाळाबरोबरच बाळाच्या आईच्या काळजी घेणे ही त्या नवमातेच्या कुटुंबीयांची जबाबदारी आहे. वेळोवेळी तिला तपासणीसाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. निरोगी आईच निरोगी बाळ घडवू शकते, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले.बाळाच्या आरोग्यासोबतच आईचे आरोग्य तितकेच महत्त्वाचे आहे. प्रसूतीनंतर स्वतःकडे दुर्लक्ष न करता वेळेवर गर्भाशय मुख तपासणी करून घेण्याचे आवाहन स्त्रीरोग तज्ज्ञांच्या वतीने करण्यात आले आहे .
तुमच्या तान्ह्या बाळांची अशी घ्या काळजी, केसांपासून ते मालिशपर्यंत या टिप्स ठरतील फायदेशीर