दारूसह कोणते पदार्थ खाणे हेल्दी ठरू शकते (फोटो सौजन्य - iStock)
आजकाल दारू अनेकांच्या जीवनाचा एक भाग बनली आहे अर्थात सर्रास लोक दारू पितात आणि ‘बिअर म्हणजे दारू नाही’ असे विधान करत अनेक जण पार्टीत बिअर रिचवतात. लोक पार्टी करण्यासाठी वीकेंडची आतुरतेने वाट पाहतात आणि दर शुक्रवारी रात्री दारूची मोठी पार्टी करणारे ग्रुपही आहेत. दारू पिणे हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे, परंतु असे असूनही, दरवर्षी दारू पिणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
दारू पिताना लोकांना अनेक मसालेदार पदार्थ खायला आवडते, त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा समावेश आहे, परंतु काही सामान्य गोष्टी आहेत. ज्या सर्वांना दारूसोबत खायला आवडतात. आज आम्ही तुम्हाला दारूसोबत सर्वात आरोग्यदायी खाण्याचा पदार्थ कोणता असू शकतो आणि कोणत्या गोष्टी धोकादायक असू शकतात ते सांगत आहोत, जाणून घ्या. Healthline ने दिलेल्या रिपोर्टनुसार आपण काही पदार्थ या लेखातून जाणून घेऊया.
दारूसोबत शेंगदाणे खाणे योग्य की अयोग्य?
जेव्हा कोणी बार किंवा पबमध्ये दारू पितो तेव्हा शेंगदाणे अनेकदा त्याच्यासोबत मोफत दिले जातात. जवळजवळ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे अल्कोहोलसोबत दिले जातात. तथापि, डॉक्टरांचा असा विश्वास आहे की स्नॅक्स म्हणून शेंगदाणे किंवा काजू घेणे काही लोकांसाठी धोकादायक असू शकते. यामुळे गॅस, बद्धकोष्ठता आणि पोटफुगी होऊ शकते, शिवाय त्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी देखील वाढू शकते. दारूसोबत मसालेदार काहीही खाणे टाळा, कारण त्यामुळे शरीरात निर्जलीकरण होऊ शकते. दारू आधीच शरीराला डिहायड्रेट करते, म्हणून या गोष्टी ते आणखी वाढवू शकतात.
कडाक्याच्या थंडीत दारू पिण्याने खरंच शरीरात उष्णता निर्माण होते का? काय सांगतात न्यूट्रिशनिस्ट
कोणते पदार्थ टाळावेत
या गोष्टी फायदेशीर ठरू शकतात
टीपः दारू वा तत्सम कोणतेही पेय पिणे हा आरोग्यास हानिकारक आहे आणि आम्ही यासाठी कोणताही पाठिंबा देत नाही. ही माहिती आम्ही केवळ माहितीसाठी दिली असून Navarashtra.com यासाठी जबाबदार नाही.