(फोटो सौजन्य: istock)
बदलत्या जीवनशैलीबरोबरच लोकांचे खाण्या-पिण्याची सवयीही बदलल्या आहेत. आजकाल पार्टीज किंवा बाहेर कुठे जायचे म्हटले की मद्यपानाचे सेवन फार सामान्य मानले जाते. अनेकांना विकेंडच्या दिवशी दारू पिण्याची सवय आहे. मात्र तुमची ही आवड तुमच्या आरोग्यासाठी किती घातक ठरते तुम्हाला माहिती आहे का? आपण कधीतरी अथवा आठवड्यातून एकदा दारूचे सेवन केले तर आपल्याला काहीच धोका नाही असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केलेल्या अभ्यासात नुकतेच काही भयानक खुलासे करण्यात आले आहेत. मध्यम प्रमाणात अल्कोहोल सेवन केल्याने स्वादुपिंडाच्या (Pancreatic cancer) कर्करोगाचा धोका वाढू शकतो, जो स्वादुपिंडात विकसित होणारा एक प्रकारचा कर्करोग आहे. बिअर आणि स्पिरिट्सचा स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या वाढीव जोखमीशी देखील संबंध असल्याचे आढळून आले आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
कोणते पदार्थ खाऊन रोज घटेल 1 किलो वजन, Baba Ramdev ने सांगितले थुलथुलीत पोट होईल सपाट
अभ्यासातून केलेले हे निष्कर्ष आशिया, युरोप, उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामधील २.५ दशलक्ष मेडिकल जर्नल PLOS Medicine लोकांच्या डेटावर आधारित आहे, याला विकलीमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. कोणत्या लोकांसाठी आणि किती प्रमाणात दारू पिणे धोकादायक आहे याविषयी चला काही सविस्तर बाबी जाणून घेऊया.
अल्कोहोलच्या सेवनामुळे स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो
WHO च्या पाठिंब्याने केलेल्या एका मोठ्या प्रमाणावरील जागतिक अभ्यासाने पुन्हा एकदा मद्यप्रेमींना सावध केले आहे. या अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, मध्यम प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केल्यानेही स्वादुपिंडाचा कर्करोग होण्याचा धोका अनेक पटींनी वाढत असतो. हा कर्करोगाचा सर्वात घातक प्रकार आहे ज्यावर उपचार करणेही फार कठीण आहे.
WHO च्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरच्या संशोधकांनी आशिया, युरोप, उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामधील 2.5 दशलक्ष प्रौढांकडून डेटा गोळा केला आणि त्यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे 10,067 रुग्ण आढळले. धूम्रपान न करणाऱ्या लोकांमध्येही हा संबंध आढळून आला. अशाप्रकारे अल्कोहोल हा कर्करोगासाठी एक स्वतंत्र जोखीम घटक असल्याचे यात दिसून आले आहे.
सिगारेट न पिता काळे झालेले ओठ सुधारण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा ट्राय, ओठ होतील गुलाबी
महिला आणि पुरुष दोन्हींमध्ये वाढतो कर्करोगाचा धोका
मद्यपान हे महिला, पुरुष अशा दोघांकडून केले जाते अशात कुणाला कर्करोगाचा जास्त धोका आहे असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. मात्र नुकत्याच पार पडलेल्या या संशोधनामध्ये, संशोधकांना असे आढळून आले की मद्यपानामुळे पुरुष आणि महिला दोघांनाही कर्करोगाचा धोका वाढतो. महिलांमध्ये, १५-३० ग्रॅम/दिवस अल्कोहोल सेवन १२% वाढीच्या जोखमीशी संबंधित होते, तर पुरुषांमध्ये, ३०-६० आणि ६० ग्रॅम/दिवस पेक्षा जास्त अल्कोहोल सेवन अनुक्रमे १५% आणि ३६% वाढीच्या जोखमीशी संबंधित होते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.