Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरात उंदरांचा सुळसुळाट वाढलाय? मग हे सोपे घरगुती उपाय करून पहा, न मारता स्वतःच निघतील घराबाहेर

अनेकजण घरातील उंदरांच्या संचारामुळे त्रस्त आहेत. एकदा का हे उंदीर घरात घुसले की यांना घराबाहेर काढणे फार कठीण काम असते. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, काही घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही उंदरांना न मारता अगदी सहज घराबाहेर काढू शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या आणि सहज घरगुती उपायांचा अवलंब करावा लागणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 22, 2024 | 06:00 AM
घरात उंदरांचा सुळसुळाट वाढलाय? मग हे सोपे घरगुती उपाय करून पहा, न मारता स्वतःच निघतील घराबाहेर

घरात उंदरांचा सुळसुळाट वाढलाय? मग हे सोपे घरगुती उपाय करून पहा, न मारता स्वतःच निघतील घराबाहेर

Follow Us
Close
Follow Us:

बहुतेक घरांमध्ये उंदरांची दहशत पाहायला मिळते. या घरातील उंदरांच्या दहशतीमुळे अनेकलोक हैराण झाले आहेत. कारण एकदा का हे उंदीर घरात आले की बाहेर जाण्याचे नाव घेत नाहीत. त्यांचा हा घरातील वावर अनेक आजरांना आमंत्रण देऊ शकतो त्यामुळे यांना वेळीच घराबाहेर काढणे कधीही सोयीचे ठरते. घरातील उंदरांना बाहेर काढणे तसे अवघडच काम आहे मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही गाडी सहज आणि काहीही विशेष करता या उंदरांना घराबाहेर काढू शकता.

उंदरांच्या संचार घरात नवनवीन आजरांना जन्म देत असतो. शिवाय अनेकदा ते अनेकदा घरातील तारा, कपडे, बूट चावून लोकांच्या समस्या वाढवतानाही दिसत असतात. अशात या उंदरांना लवकरात लवकर घराबाहेर काढणे हा एकाच उत्तम उपाय ठरू शकतो. घरातील उंदरांना बाहेर काढण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या काही उपायांचा वापर करू शकता.

हेदेखील वाचा – विकत आणायची गरज नाही, या टिप्स फॉलो करून घरीच तयार करा घट्ट दही

कांदा ठरेल उपयुक्त

कांद्याच्या वासाने घरातील उंदीर पळू लागतात. याचा उग्र वास त्यांना आवडत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कांदा कापून घराच्या एका कोपऱ्यात ठेवू शकता. मात्र, कांदा लवकर सुकतो. त्यामुळे दर 2-3 दिवसांनी कांदा बदलत राहा. या उपायाच्या मदतीने तुम्ही घरातील उंदीरं पळवून लावू शकता.

पीनट बटरचा करा वापर

पीनट बटर हे माणसांनाच नाही तर उदरांनाही फार आवडते. याचा सुगंध त्यांना जवळ यायला भाग पाडत असतात. आता याच पीनट बटरचा वापर करून तुम्ही एक सापळा रचू शकता. जर तुम्हाला उंदीर पकडायचे असतील तर कोणत्याही ब्रेडवर पीनट बटर लावा आणि सापळा लावा. यामुळे उंदीर पकडला जाईल आणि तुम्हाला त्याला घराबाहेर काढता येईल.

हेदेखील वाचा – भिंतीवरील काळे डाग घराचा लूक खराब करतायेत? या घरगुती पदार्थांचा वापर करून क्षणार्धात दूर करा हट्टी डाग

लाल मिरचीची मदत घ्या

घरातील उंदीर दूर करण्यासाठी लाल मिरची एक प्रभावी उपाय ठरू शकतो. उंदरांना न मारता घरातून हाकलण्यासाठी तुम्ही लाल मिरचीचा वापर करू शकता. यासाठी ज्या ठिकाणी अधिकतर उंदीर दिसतात त्या ठिकाणी तिखट किंवा सुकी तिखट ठेवा. यामुळे उंदीर घरातून पळून जातील.

पेपरमेंट तेलाचा करा वापर

आम्ही तुम्हाला सांगतो की, उंदरांना पुदिन्याचा वास अजिबात आवडत नाही. त्यामुळे उंदीर घराबाहेर घालवण्यासाठी तुम्ही पेपरमेंट तेलाचा करू शकता. यासाठी कापसावर पेपरमेंट तेल टाकून घराच्या कानाकोपऱ्यात ठेवा. असे केल्याने, घरातील उंदीर बाहेर पडतील. तसेच पेपरमिंट ऑइल तुमच्या घरासाठी रूम फ्रेशनर म्हणूनही काम करेल.

Web Title: Best home remedies to remove rats from your house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2024 | 06:00 AM

Topics:  

  • kitchen tips
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

बोलतानाही धाप लागतेय? दुर्लक्ष करू नका, वाढू शकतो हृदय किंवा फुप्फुसांच्या आजाराचा धोका…
1

बोलतानाही धाप लागतेय? दुर्लक्ष करू नका, वाढू शकतो हृदय किंवा फुप्फुसांच्या आजाराचा धोका…

Flowering Plants: घराच्या बाल्कनीमध्ये लावा ‘ही’ सुंदर फुलझाडे, घरामध्ये ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा
2

Flowering Plants: घराच्या बाल्कनीमध्ये लावा ‘ही’ सुंदर फुलझाडे, घरामध्ये ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा

तुम्ही 70 वर्षे जगणार की 100 वर्षे? फक्त खाण-पान नाही तर ही गोष्ट ठरवते तुमचे आयुष्य किती असेल; नवी रिसर्च आली समोर
3

तुम्ही 70 वर्षे जगणार की 100 वर्षे? फक्त खाण-पान नाही तर ही गोष्ट ठरवते तुमचे आयुष्य किती असेल; नवी रिसर्च आली समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.