सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. पावसाळ्यात दमट वातावरण असते. या ऋतूत आरोग्याबरोबरच इतरही समस्या उद्भवत असतात. यातीलच एक समस्या म्हणजे, भिंतींवर वाढणारी बुरशी. .पाऊस आणि आर्द्रतेमुळे बहुतेक लोक त्यांच्या घराच्या भिंतींवर वाढणाऱ्या बुरशीच्या समस्येने त्रस्त असतात. यामुळे आपल्या घराचा एकंदरीत लूक खराब होतो आणि पाहुणे आले की, आपल्यालाही त्यामुळे थोडे अवघडल्यासारखे वाटू लागते. तसेच ही बुरशी तुमच्या त्वचेसाठीही धोकादायक ठरत असते त्यामुळे हिला वेळीच दूर करणे फार गरजेचे असते.
बुरशीच्या संपर्कात आल्याने काहींना ऍलर्जीच्या समस्यांना सामोरे जायला लागू शकते. ज्यामुळे त्वचेची जळजळ, लालसरपणा, खाज सुटणे यासारख्या समस्या वाढू शकतात. यामुळे संसर्गाचा धोकादेखील वाढू शकतो. अशा परिस्थितीत, घराच्या भिंतींमधून बुरशीची साफसफाई करणे खूप महत्वाचे आहे. पण काही घरगुती गोष्टीचा वापर करून तुम्ही या गोष्टी घरातून दूर करू शकता.
हेदेखील वाचा – Healthy Recipe: सकाळच्या नाश्त्याची चिंता सोडा, झटपट बनवा क्विनोआ उपमा
पावसाळ्यात हवेत आर्द्रता असते, त्यामुळे घरात ठेवलेल्या वस्तू ओलसर राहतात. अशा परिस्थितीत तुमच्या घरात ताजी हवा खेळती राहील याची खबरदारी घ्या. यासाठी घरातील खिडक्या या बंद न ठेवता उघड्या करून ठेवत जा, जेणेकरून बाहेरील हवा किंवा ऊन घरात येत राहील. घरातील फर्निचर किंवा बुक शेल्फ भिंतींना चिकटणार नाहीत याची काळजी याची काळजी घ्या. बुरशी प्रथम भिंतीवर येत असते त्यामुळे कोणतीही गोष्ट भिंतीजवळ एकदम चिटकून अशी ठेवू नका. बुरशी जर लागलीच तिला दूर करण्यासाठी तुम्ही ब्लीचचा वापर करू शकता.
लिंबूमध्ये ब्लीचिंग एजंट असते, जे फंगसची समस्या दूर करण्यासाठी प्रभावी मानले जाते. त्यामुळेच घरातील बुरशी दूर करण्यासाठी तुम्ही लिंबाचा वापर करू शकता. यासाठी प्रथम तुम्हाला कोमट पाण्याने ज्या भागात बुरशीची वाढ होत आहे ती जागा धुवावी लागेल आणि नंतर लिंबाचा रस किंवा लिंबाचा तुकडा घासाल्याने फायदा होईल. यांनतर ब्रश किंवा स्क्रबचा मदतीने बुरशी साफ करा.
हेदेखील वाचा – जपानचे लोक रोज या गोष्टी फॉलो करून जगतात 100 वर्ष आयुष्य, दीर्घकाळ राहतात फिट आणि स्लिम
बुरशी किंवा हट्टी डाग दूर कारण्यासाठी व्हाईट व्हिनेगर हा एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे. यासाठी, फक्त पांढरे व्हिनेगर थोड्या प्रमाणात पाण्याने मिसळून पातळ करा आणि नंतर थेट बुरशीच्या पृष्ठभागावर याची फवारणी करा. यानंतर ते काही तास तसेच राहू द्या आणि नंतर एका कापडाने स्वच्छ करा. हा उपाय 2 ते 3 वेळा केल्यावर तुम्हाला निश्चितच फरक जाणवेल.
अंधाऱ्या आणि बंद खोल्यांमध्ये बुरशीची वाढ जास्त होते, अशा परिस्थितीत तुम्ही कापूर वापरू शकता. यासाठी कापूर गोळ्या आणि लवंगा कापडात बांधून वॉर्डरोब, शू रॅक किंवा बुक शेल्फमध्ये ठेवा. बुरशी न येण्यासाठी हा उपाय फार प्रभावी मानला जातो. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही इतर ठिकाणीही वापरू शकता जिथे बुरशीच्या समस्या येतात.