भारतीय स्वयंपाकघरात दही मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. अनेकदा जेवल्यानंतर किंवा जेवणातच वापर केला जातो. अनेक भाज्यांची चव वाढवण्यासाठी किंवा टेस्टी ग्रेव्ही बनवताना ही दही फार मदतीची ठरत असते. मात्र दररोज दहीचे सेवन आरोग्यासाठी चांगले नाही. अशा परिस्थितीत तुम्ही घरीच बाजारात विकत मिळते अशी घट्ट दही तयार करू शकता. विकतच्या पदार्थांमध्ये अधिकतर रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो अशात जितक्या जास्त गोष्टी तुम्ही घरी बनवाल तितके तुमच्या आरोग्यासाठी उत्तम राहील.
दही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. निरोगी ठेवण्यास दहाची मदत होत असते. त्वचेची चमक वाढवण्यासही दही फायद्याची ठरत असते. आता अनेकांना दही घरी कसे बनवावे ते माहिती नसते. तसेच बऱ्याच जणांची दही घरी हवी तशी घट्ट होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी दही बनवण्यसाठीच्या काही टिप्स घेऊन आलो आहोत. या टिप्स फॉलो करून तुम्ही घरच्या घरी बाजारासारखी घट्ट दही तयार करू शकता.
हेदेखील वाचा – Skincare: कच्च्या दुधापासून बनवलेले हे 5 फेस पॅक चेहरा चमकदार बनवतात, योग्य पद्धत जाणून घ्या
दही बनवण्यासाठी तुम्ही मिरचीचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला 3-4 हिरव्या मिरच्या लागतील. . फक्त त्याच्या मदतीने तुम्ही तुमचे परिपूर्ण दही सेट करू शकता. दही बनवण्यासाठी दूध उकळवून कोमट होईपर्यंत थांबा. आता ज्या भांड्यात दही बनवायचे आहे त्या भांड्यात दूध टाका आणि मग यात 3-4 हिरव्या मिरच्या घेऊन त्यावरील देठ तोडून दुधात टाका. यानंतर रात्रभर खोलीच्या तापमानावर हे भांडे बाजूला ठेवून द्या. सकाळी तुम्हाला यात बाजारासारखे दही गोठल्याचे दिसून येईल. यानंतर फ्रिजमध्ये ठेवून तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही या दहाचा वापर करू शकता.
हेदेखील वाचा – भिंतीवरील काळे डाग घराचा लूक खराब करतायेत? या घरगुती पदार्थांचा वापर करून क्षणार्धात दूर करा हट्टी डाग