लिव्हरची काळजी घेण्यासाठी नक्की काय करावे (फोटो सौजन्य - iStock)
आपल्या शरीरातील Liver हा एक चमत्कारिक अवयव आहे जो स्वतःला बरा करू शकतो. जर तुमचे लिव्हर अल्कोहोल, चरबी किंवा औषधांमुळे खराब झाले असेल तर ते कसे बरे करायचे याबाबत आपण या लेखातून माहिती घेऊया. तुम्हाला हे वाचून नक्कीच आश्चर्य वाटले असेल. पण लिव्हर त्याच्या पेशींमधून सर्व कचरा काढून टाकण्यासाठी तुम्हाला 5 गोष्टी कराव्या लागतील, जे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
आहारतज्ज्ञ श्रेया गोयल म्हणाल्या की जर तुम्हाला लिव्हर वाचवायचे असेल तर स्वतःला 90 दिवस द्या. कारण लिव्हर हे स्वतःच्या पेशी स्वतः पुन्हा निर्माण करू शकतात. या उपायांनी तुम्ही लिव्हर सिरोसिस टाळू शकता. जो यकृताच्या नुकसानाचा शेवटचा टप्पा आहे. यानंतर, शस्त्रक्रियेद्वारे प्रत्यारोपण करावे लागते, त्यामुळे वेळीच तुम्ही या गोष्टींची काळजी घ्यावी (फोटो सौजन्य – iStock)
साखर करा वर्ज्य
साखर पूर्णतः बंद करा
तुम्ही कोणतीही साखर किंवा विविध पदार्थांतून साखर घेत असाल तर ती ताबडतोब बंद करा. साधारणतः साखर बार्बेक्यू सॉस, केचप, फळांचा रस, कॉर्न सिरप, ग्रॅनोला बार, प्रोटीन बारमध्ये देखील असते. त्यामुळे हे पदार्थ खाणे टाळा. लिव्हर या साखरेचे चरबीमध्ये रूपांतर करते. म्हणून सर्वप्रथम सर्व प्रकारची साखर पूर्णपणे बंद करणे अत्यंत गरजेचे आहे
Liver Care: लिव्हर चांगले राखण्यासाठी काय खावे? वेळीच सुरू करा नाहीतर अर्ध्यातच गमवाल ‘जीव’
ओमेगा 3 आणि 6 फॅटी अॅसिड
फॅटी अॅसिड पदार्थांचा करा समावेश
तुमच्या आहारात ओमेगा ३ आणि ओमेगा ६ असलेच पाहिजेत. ते १:२ ते १:४ च्या प्रमाणात ठेवा ज्याचा तुमच्या शरीराला फायदा होतो आणि विशेषतः लिव्हरसाठी याचा अधिक फायदा करून घेता येतो. ओमेगा ६ असलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने जळजळ होते त्यामुळे प्रमाणात खा मात्र, दुसरीकडे ओमेगा ३ जळजळ कमी करते आणि मेंदू, हृदय आणि सांध्यांना आधार देते
पॉलिफेनॉल्स
हिरव्या – लाल रंगाच्या भाज्यांचा करा आहारात समावेश
हिरव्या आणि लाल रंगाच्या रसासारख्या वनस्पतींपासून पॉलीफेनॉलचे स्रोत तुम्ही आपल्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता. हे करण्यासाठी, तुम्ही घरी उपलब्ध असलेल्या हिरव्या भाज्यांचा वापर करू शकता. तुम्ही कढीपत्ता, मोरिंगा, काकडीपासून हिरवा रस बनवू शकता. याशिवाय बीटरूट, टोमॅटो, गाजरपासून लाल रस बनवू शकता. दररोज यापासून २५ ग्रॅम फायबर घ्या, ज्यामुळे तुमचे लिव्हर निरोगी राहते
काय खावे
या पदार्थांचा आहारात समावेश करा
दिवसातून तुम्ही तीन वेळा खाणे गरजेचे आहे आणि त्यापैकी दोन वेळा आहारात फायबर असावे तर एक वेळा तुम्ही पुरेसे आणि योग्य जेवण जेवावे, याला OMAD असे म्हटले जाते. हे संपूर्ण खाणे हाय ग्रेन अर्थात उच्चतम धान्यांने युक्त असायला हवे, जे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनयुक्त असते. यामुळे लिव्हरचे आरोग्य निरोगी राहते
त्वचेला येतेय खाज आणि जाणवत असतील 5 संकेत, तर Liver सडून गंभीर आजार होण्याची शक्यता
झोपण्यापूर्वी 4 तास आधी खावे
झोपायच्या आधी ४ तास खावे
रात्री तुम्ही ज्या वेळी झोपता त्याआधी साधारण 4 तास आधी तुम्ही खाणे गरजेचे आहे. यामुळे लिव्हर स्वतःच स्वतःच्या पेशी तयार करते. यामुळे तुम्ही दूध वा कोणतेही अन्न खाणार वा पिणार असाल तर झोपण्यापूर्वी चार तास आधी त्याचे सेवन करावे. संध्याकाळी साधारण ४ ते ६ या वेळात तुम्ही जेऊन घ्यावे. ९० दिवसात तुम्ही याचा फायदा करून घेऊ शकता आणि परिणामही पहा.
डाएटिशियनची पोस्ट
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.