भारती सिंहने कसे केले वजन कमी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
कॉमेडियन भारती सिंगने तिच्या फॅट टू फिट प्रवासात खूप लवकर यश मिळवले आहे. भारती सिंहचा 3 जुलै रोजी वाढदिवस असतो. कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाणारी भारती याआधी खूपच वजनशीर होती आणि यावरून ती स्वतःच खूपदा बोलायची. मात्र तिने अल्पावधीतच 15 किलो वजन कमी केले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह जास्त वजनाच्या समस्येमुळे मधुमेह आणि अस्थमासारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त होती. मात्र, गर्भधारणेपूर्वी तिने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. वजन कमी करण्यासाठी भारतीने इंटरमिटेंट फास्टिंगची मदत घेतली, जी तिच्यासाठी खूप फायदेशीर ठरली. याबाबत तिने अनेक मुलाखतीमध्येही सांगितले आहे. काय आहे नक्की इंटरमिटेंट फास्टिंग जाणून घ्या. (फोटो सौजन्य – Instagram/iStock)
काय आहे इंटरमिटेंट फास्टिंग
इंटरमिटेंट फास्टिंग हे एक प्रकारचे अन्न नियोजन तंत्र आहे. यामध्ये तुम्हाला ठराविक कालावधीसाठी उपवास करायचा असतो आणि ठराविक कालावधीमध्येच खावे लागते. तुम्हाला दररोज काही तास खाणे बंद करावे लागते किंवा दिवसातून केवळ दोन वेळाच खाण्याची परवानगी असते. यामुळे वजन लवकर कमी करण्यास मदत मिळते. कॉमेडी क्वीन भारती सिंगने या तंत्राच्या मदतीने 15 किलो वजन कमी केले.
NCBI च्या माहितीनुसार, संशोधनात असेही नमूद केले आहे की उपवास हा तुमचे वजन नियंत्रित करण्याचा आणि रोखण्याचा एक सोपा मार्ग आहे.
हायड्रेशनची विशेष काळजी घ्यावी

पाणी पिणे गरजेचे
उपवास करताना पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या शरीरात 60 टक्के पाणी असते. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे आहे. या डाएट प्लॅन दरम्यान पाणी प्यायल्याने तुम्हाला खूप आराम मिळतो. उपवासात पाणी न मिळाल्याने अनेक समस्या निर्माण होतात. जर तुम्ही हे डाएट फॉलो करत असाल तर तुम्हाला नियमित पाणी पिण्याची गरज आहे.
इंटरमिटेंट फास्टिंग कसे करावे?
इंटरमिटेंट फास्टिंग करण्याचे काही मार्ग आहेत. इंटरमिटेंट फास्टिंग सुरू करण्यापूर्वी आपण फिटनेसचे ध्येय, शरीराचे वजन आणि आरोग्य यासारख्या काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. आहारतज्ज्ञ तुम्हाला योग्य योजनेबद्दल अधिक चांगला सल्ला देऊ शकतात. कोणतीही योजना फॉलो करण्यापूर्वी कृपया आपल्या आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
कसे केले भारतीने इंटरमिटेंट फास्टिंग

भारतीचे इंटरमिटेंट फास्टिंग
भारती संध्याकाळी 7 नंतर आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत जेवल्याशिवाय राहायची. तिने एक ठराविक वेळ ठरवून घेतली होती आणि त्यानुसार तिने हे फास्टिंग फॉलो केले. याचा परिणाम म्हणजे तिने काही महिन्यातच 15 किलो वजन कमी केले. मात्र, याशिवाय आम्ही आणखी काही पद्धती सांगत आहोत.
इंटरमिटेंट फास्टिंगची पद्धत

इंटरमिटेंट फास्टिंग करण्याची पद्धत
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.






