Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारती सिंहची फॅट टू फीट जर्नी, Intermittent Fasting ने केले होते 15 किलो वजन कमी

Bharti Singh Birthday: वजन कमी करण्यासाठी, तुम्ही अनेक प्रकारचे आहार आणि व्यायामाचे पालन करता. पण एखाद्या सेलिब्रिटीने हे केले तर वेगळीच प्रेरणा मिळते. कॉमेडी क्वीन भारती सिंह ही सर्वांची आवडती असून तिचा ३ जुलै रोजी वाढदिवस असतो, जाणून घ्या भारती सिंह 'फॅट टू फिट' कशी झाली.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 03, 2024 | 12:56 PM
भारती सिंहने कसे केले वजन कमी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

भारती सिंहने कसे केले वजन कमी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

कॉमेडियन भारती सिंगने तिच्या फॅट टू फिट प्रवासात खूप लवकर यश मिळवले आहे. भारती सिंहचा 3 जुलै रोजी वाढदिवस असतो. कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाणारी भारती याआधी खूपच वजनशीर होती आणि यावरून ती स्वतःच खूपदा बोलायची. मात्र तिने अल्पावधीतच 15 किलो वजन कमी केले. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह जास्त वजनाच्या समस्येमुळे मधुमेह आणि अस्थमासारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त होती. मात्र, गर्भधारणेपूर्वी तिने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. वजन कमी करण्यासाठी भारतीने इंटरमिटेंट फास्टिंगची मदत घेतली, जी तिच्यासाठी खूप फायदेशीर ठरली. याबाबत तिने अनेक मुलाखतीमध्येही सांगितले आहे. काय आहे नक्की इंटरमिटेंट फास्टिंग जाणून घ्या. (फोटो सौजन्य – Instagram/iStock)

काय आहे इंटरमिटेंट फास्टिंग 

इंटरमिटेंट फास्टिंग हे एक प्रकारचे अन्न नियोजन तंत्र आहे. यामध्ये तुम्हाला ठराविक कालावधीसाठी उपवास करायचा असतो आणि ठराविक कालावधीमध्येच खावे लागते. तुम्हाला दररोज काही तास खाणे बंद करावे लागते किंवा दिवसातून केवळ दोन वेळाच खाण्याची परवानगी असते. यामुळे वजन लवकर कमी करण्यास मदत मिळते. कॉमेडी क्वीन भारती सिंगने या तंत्राच्या मदतीने 15 किलो वजन कमी केले. 

NCBI च्या माहितीनुसार, संशोधनात असेही नमूद केले आहे की उपवास हा तुमचे वजन नियंत्रित करण्याचा आणि रोखण्याचा एक सोपा मार्ग आहे.

हायड्रेशनची विशेष काळजी घ्यावी 

पाणी पिणे गरजेचे

उपवास करताना पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या शरीरात 60 टक्के पाणी असते. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे आहे. या डाएट प्लॅन दरम्यान पाणी प्यायल्याने तुम्हाला खूप आराम मिळतो. उपवासात पाणी न मिळाल्याने अनेक समस्या निर्माण होतात. जर तुम्ही हे डाएट फॉलो करत असाल तर तुम्हाला नियमित पाणी पिण्याची गरज आहे. 

इंटरमिटेंट फास्टिंग कसे करावे?

इंटरमिटेंट फास्टिंग करण्याचे काही मार्ग आहेत. इंटरमिटेंट फास्टिंग सुरू करण्यापूर्वी आपण फिटनेसचे ध्येय, शरीराचे वजन आणि आरोग्य यासारख्या काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.  आहारतज्ज्ञ तुम्हाला योग्य योजनेबद्दल अधिक चांगला सल्ला देऊ शकतात. कोणतीही योजना फॉलो करण्यापूर्वी कृपया आपल्या आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या. 

कसे केले भारतीने इंटरमिटेंट फास्टिंग

भारतीचे इंटरमिटेंट फास्टिंग

भारती संध्याकाळी 7 नंतर आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत जेवल्याशिवाय राहायची. तिने एक ठराविक वेळ ठरवून घेतली होती आणि त्यानुसार तिने हे फास्टिंग फॉलो केले. याचा परिणाम म्हणजे तिने काही महिन्यातच 15 किलो वजन कमी केले. मात्र, याशिवाय आम्ही आणखी काही पद्धती सांगत आहोत.

इंटरमिटेंट फास्टिंगची पद्धत 

इंटरमिटेंट फास्टिंग करण्याची पद्धत

  • 16 तास उपवास करा आणि 8 तास खा
  • आठवड्यातून 5 दिवस काहीही खा आणि 2 दिवस फक्त 500 कॅलरीज वापरा
  • आठवड्यातून सलग एक किंवा दोन दिवस उपवास ठेवा आणि उरलेल्या दिवसांत तुमच्या मनाला आवडेल असे काहीही खा
  • इच्छा असल्यास, आपण एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशीदेखील उपवास करू शकता. याचा अर्थ एक दिवस खा आणि दुसऱ्या दिवशी खाऊ नका
  • 20 तास उपवास आणि 4 तास खाणे 
या दिलेल्या पद्धतींनुसार निवडले जाऊ शकतात. यामुळे वजन कमी करण्यात खूप मदत होईल. जर तुम्हाला कोणताही गंभीर आजार असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि तुमच्या आहारतज्ज्ञांच्या देखरेखीखाली हा उपवास अथवा हा डाएट प्लॅन केला पाहिजे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Bharti singh weight loss journey lose 15 kg with intermittent fasting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2024 | 12:55 PM

Topics:  

  • Weight loss

संबंधित बातम्या

Health Update:मध्यम शहरांतही पोहोचली वेटलॉसची क्रेझ! महिलांमध्ये मेडिकल वेट मॅनेजमेंटची वाढती मागणी
1

Health Update:मध्यम शहरांतही पोहोचली वेटलॉसची क्रेझ! महिलांमध्ये मेडिकल वेट मॅनेजमेंटची वाढती मागणी

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
2

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.