
Sonia Gandhi Favourite Food: वाढलेले वजन कमी करायचे आहे? मग सोनिया गांधीना आवडणाऱ्या 'या' पदार्थांचे आहारात करा सेवन
Sonia Gandhi Favourite Food: जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांमुळे शरीरात अनेक बदल दिसू लागतात. वजन वाढणे, कोलेस्ट्रॉल वाढणे तर काहीवेळा उच्च रक्तदाबसुद्धा वाढू लागतो. वजन वाढल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने पोट आणि मांड्यावर चरबीचा अनावश्यक घेर वाढू लागल्यानंतर दैनंदिन कामांमध्ये सुद्धा अडथळे निर्माण होतात. त्यामुळे वजन वाढल्यानंतर किंवा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य डाएट फॉलो करणे फार आवश्यक आहे. सोनिया गांधींच्या कुटुंबातील अनेक गोष्टी कायमच चर्चा विषय असतात. बिलॉन्गिंगः अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनानंतर त्यांच्या आहाराविषयी अनेक गोष्टी चर्चेत आल्या आहेत.(फोटो सौजन्य – istock)
खांदा सतत दुखतोय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला
सोनिया गांधींना कबाब, चिकन टिक्का, तंदुरी चिकन, दाल मखणी, काश्मिरी कोफ्ता आणि हाख इत्यादी पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. गांधी कुटुंबियांच्या आहारात कायमच तूरडाळ असते. भारतीय स्वयंपाक घरात आहारामध्ये कायमच तूरडाळ आणि मूगडाळीचे सेवन केले जाते. या डाळी सहज पचन होतात आणि शरीरासाठी सुद्धा गुणकारी आहेत. भारतीय महिलांच्या शरीरात प्रथिनांची मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवते. त्यामुळे आहारात तूरडाळीचे आवश्यक सेवन करावे. चला तर जाणून घेऊया वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तूरडाळीचे सेवन कशा पद्धतीने करावे आणि त्याचे शरीराला होणारे फायदे.
तुरडाळीमध्ये लायसिन, ल्युसिन, आयसोल्युसिन आणि व्हॅलिन यांसारखे घटक असतात. या घटकांचा शरीराला सुद्धा खूप जास्त फायदा होतो. शाहाकारी आहारामध्ये तूरडाळीचे प्रामुख्याने सेवन केले जाते. शरीराच्या योग्य वाढीसाठी आणि स्नायूंच्या बळकटीसाठी प्रथिनांची खूप जास्त आवश्यकता असते. त्यामुळे न चुकता आहारात प्रथिनांचा समावेश करावा. मानवी शरीर स्वतः अमिनो आम्ले तयार करत नाही. त्यामुळे शरीराला आहारावर अवलंबून राहावे लागते. शरीरात निर्माण झालेली प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी तूरडाळ खावी.
तूर डाळ खाल्ल्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. ही डाळ पूर्णपणे वनस्पतिजन्य अन्नपदार्थ असल्यामुळे यामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी अजिबात नसते. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्यासाठी तूरडाळीचा आहारात समावेश करावा. तुरीच्या डाळीमध्ये असलेले पोटॅशियम आणि फायबर रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे तूरडाळीचा वापर करून बनवलेली खिचडी किंवा सूप बनवून पिऊ शकता.
दैनंदिन आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. आहारात डाळी आणि पालेभाज्यांचे आवश्यक सेवन करावे. तुरडाळीमध्ये डायटरी फायबर असतात, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या समस्या कमी होण्यास मदत होते. यामध्ये आतड्यांची उपयुक्त असणारे घटक सुद्धा असतात. तुरडाळीमध्ये असलेल्या कार्बोहायड्रेट्समुळे सुरुवातीला गॅस होऊ शकतो, त्यामुळे शिजवण्याच्या पद्धतीमध्ये बदल करावा.
Ans: सोनिया गांधी यांना आवडणाऱ्या या पारंपरिक घरगुती पदार्थाबद्दल जाणून घेण्यासाठी त्याच्या आहारातील वापर आणि वैशिष्ट्ये समजून घेणे महत्त्वाचे आहे.
Ans: योग्य प्रमाणात आणि संतुलित आहाराचा भाग म्हणून या पदार्थाचे सेवन केल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
Ans: कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रथिने असलेले पदार्थ हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात.