फोटो सौजन्य - Social Media
आहिल्यानगर जिल्ह्यातील एका छोटाशा गावात रंजन आणि साहिल उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी आले होते. दोघे तसे मुंबईला राहणारे. दोघे भावंडं नसली तरी एकाच गावातली घट्ट मित्र! सोबत राहणे, खाणे, फिरणे… अगदी लहानपानपासून दोघे जण प्रत्येक काम अगदी सोबतच करतात. परीक्षा संपवून दोघे जण गावी आले होते. साहिल तर दिवस असो वा रात्र, रंजनचा घर काही त्याला सुटत नव्हता. दोघे दिवस रात्र खेळात असत. एकेदिवशी, रंजनच्या आजीने दोघांना ठणकावून सांगितली की माळरानावर जाऊ नका! आणि रात्रीच्या वेळी तर मुळीच फिरकू नका. तिथे भुतांची जत्रा भरते. रंजन आणि साहिल तसे हार्ड कोर मुंबईकर! त्यांना या गोष्टी ऐकून नवल वाटले आणि विश्वास बसे ना!
रंजन आणि साहिलने ही गोष्ट फार काही मनावर घेतली नाही. एकदिवस असा आला की अमावस्येची रात होती. संध्याकाळ होत आली होती. काळोख झाला होता. तेव्हा रंजनच्या डोक्यात एक भन्नाट विचार आले. त्याने जेवून घेतले आणि बाईक काढली. साहिलला सोबत घेतले आणि गावभर हिंडू लागले. रात्रीचे साडे १० होत आलेले, दोघे घराकडे निघाले होते. तेव्हा रंजन अचानक बाईक त्या माळरानाकडे वळवतो. साहिल त्याला अनेकदा म्हणतो की तेथे जाणे योग्य नाही, आपण घराकडे जाऊयात. रंजन साहिलचे ऐकत नाही, शेवटी दोघे माळरानावरच्या त्या कुप्रसिद्ध झाडाजवळ येऊन ठेपतात.
साहिल आणि रंजन दोघे जाऊन त्या झाडावरही चढतात. झाडाच्या फांदीवर बराच वेळ काढतात. ११ वाजून गेलेले असतात. रंजनच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. तो साहिललाही सांगतो की पाहिलं ना, गावकऱ्यांना उगाच भीती वाटते! हे सांगून दोघे झाडावरून उतरण्याच्या तयारीतच असतात. तितक्यात दोघांच्या कानावर लोकांच्या किंचाळण्याचा आवाज येतो. जसे की दूरवर काही तरी कार्यक्रम सुरु आहे. लोकं आनंदाने गीत गात, उत्सव साजरा करत आहेत. असं काही त्यांना वाटतं. ते दोघे आवजच्या दिशेने पाहू लागतात. पाहताच दोघे स्तब्ध होतात. अंगावरून घामाच्या धारा सुटू लागतात. कारण दूरवरून एक शेकडो माणसांचा घोळका हातात बाजे, मशाली आणि अनेक चित्र विचित्र गोष्टी घेऊन माळरानकडे येत असतात.
रंजनला तर त्या घोळक्यात एक पालखीही दिसत असते. दोघांच्या तोंडातून शब्द फुटेनासे होते. बघता बघता ती पालखी त्या झाडाच्या अगदी शेजारी येऊन ठेपते. दोघे जण एका मोठ्या फांदीच्या आड जाऊन लपतात. ती पालखी जेव्हा झाडाच्या पुढे निघून जाते, तेव्हा हे सुखाचा श्वास सोडतात. दोघेजण झाडावरून खाली उतरतात. जसे घरी जाण्यासाठी मागे वळतात, त्यांच्या समोर एक माणूस उभा असतो. तो त्यांना म्हणतो, “पोरांनो! एकेकाळी मी पण तुमच्यासारखा ही पालखी पाहण्यासाठी आलो होतो. हा घोळका पाठलाग सोडत नाही. जर तुम्हाला यांच्यापासून वाचायचे आहे तर पळत त्या घोळक्यात शिरा आणि त्या पालखीचे दर्शन घ्या. दर्शन घेऊन लगेच पळत सुटा. मगच तुमचा जीव वाचू शकतो.” हे ऐकून रंजन आणि साहिलच्या अंगातून घामाची धार अधिकच वाढू लागली. दोघांनी कसलाही विचार न करता, त्या पालखीच्या दिशेने पळत सुटले. पालखीचे दर्शन घेतले.
तेव्हा त्या घोळक्यातील एका भुताने साहिलचा हात धरला. क्षणातच, ते भूत साहिलच्या अंगात शिरला आणि किंचाळू लागला. रंजनने तेव्हा कसलाही वेळ न घालवता, थरथरत्या हाताने त्याच्या गळ्यातील हनुमंताची माळ साहिलच्या गळ्यात टाकली. तेव्हा साहिलचे शरीर सुटले आणि दोघांनी पळता भुई एक केली. दोघे गावाच्या दिशेने पळू लागले. त्यांच्या मागे भुतांचा तो घोळका जोरजोरात किंचाळत पळू लागला. अगदी जीवाचीही पर्वा न करता दोघे वाऱ्याच्या वेगाने पळत होते. तेव्हा रंजनला दूरवर एक हनुमानाचे मंदिर दिसले. रंजनने वाट बदलली. साहिलचा हात धरून तो मंदिराच्या दिशेने पळू लागला. मग तर जणू चमत्कारच झाला. जस जसे ते मंदिराजवळ येऊ लागले, समोरून काही माकडे त्यांच्या दिशेने धावत येत होते. ही माकडे बघताच क्षणी त्या भुतांच्या घोळक्यावर तुटून पडली आणि माकडांसहित भूतही नाहीशी झाली.