Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Konkan Ro-Ro Ferry: कोकणात जाणाऱ्या रो-रो फेरीचे तिकीट दर कमी करा, कोकणवासियांची मागणी

Konkan Ro-Ro Ferry News: कोकणात विकासाला गती देणारा मुंबई- विजयदुर्ग हा जलमार्ग अखेर 1 मार्चपासून सुरू होत आहे. कोकणवासीयांसाठी हा प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि आरामदायी होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 23, 2026 | 02:27 PM
कोकणात जाणाऱ्या रो-रो फेरीचे तिकीट दर कमी करा, कोकणवासियांची मागणी (फोटो सौजन्य-Gemini)

कोकणात जाणाऱ्या रो-रो फेरीचे तिकीट दर कमी करा, कोकणवासियांची मागणी (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:

कौस्तुभ खातू : १ मार्चपासून मुंबई ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग दरम्यान रो-पॅक्स प्रवासी फेरी सेवा सुरू करण्याची घोषणा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. मात्र आता ही सेवा तिकीट दरांमुळे वादात सापडली असून, बोटीचे तिकीट दर कमी करण्याची मागणी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी केली आहे.

रो-रो सेवेच्या तुलनेत बस आणि रेल्वे तिकीट अधिक परवडणारे आहे. त्यामुळे शासनाने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू करण्यात येणाऱ्या बोटीचे तिकीट दर त्यांना परवडतील असेच ठेवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. या सेवेचे उद्घाटन १ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ वाजता मुंबईतील फेरी व्हार्फ येथून होणार आहे.

एआय कृषी क्षेत्रासाठी परिवर्तनकारी साधन; इन्फोसेस कंपनीने दिली कौतुकाची थाप

३५ वाहने वाहून नेण्याची क्षमता

मुंबई विजयदुर्ग मार्गावर एमएम प्रिन्सेस’ हे आधुनिक जहाज चालविण्यात येणार आहे. एका फेरीत सुमारे ६२० प्रवासी आणि ३५ वाहने वाहून नेण्याची या जहाजाची क्षमता आहे. या मार्गाने मुबईहून विजयदुर्ग येथे अवघ्या ६ ते ७ तासांत पोहोचता येणार आहे.

आम्ही दरवर्षी गणपती, यात्रा आणि शिमग्यासाठी कारने गावाला जातो. बोटीमुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार असली तरी, त्याचे गाडीसह प्रवासी तिकिटदर पाहता रस्ते मागनिच जाणे परवडणारे आहे. बोटीपेक्षा पेट्रोल खर्च कमी आहे, अशी प्रतिक्रिया प्रवासी कल्पेश सुर्वे यांनी दिली.

मुंबई-सिंधुदुर्ग मार्गावर रो रो बोट सेवा सुरू होणार ही आनंदाची बातमी असली तरी, तिचे दर पाहून सर्वसामान्य कोकणी माणसाचा अपेक्षाभंग झाला आहे. लहान कार आणि चार प्रवासी घेऊन जाण्यासाठी किमान १८ हजार रुपये खर्च येणार आहे. शासनाने मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, रस्त्यावरून जाण्यासाठी तयार झालेले वाहन बोटीने कोकणात न्यावे लागणार नाही, अशी माहिती कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती सचिव, अखंड अक्षय महापदी यांनी दिली.

फर्स्ट क्लास – ९ हजार रुपये
बिझनेस – ७ हजार रुपये
प्रिमियम इकॉनॉमी – ५ हजार रुपये
इकॉनॉमी – 3 हजार रुपये

तर ट्रेन तिकीटाचे दर (सीएसएमटी ते मडगाव)
व्हिस्टाडोम – २,८२७
एक्झिक्युटिव्ह चेअर कार – २,७४२
चेअर कार- १,२७७

असे आहे वेळापत्रक

२,००० एसी स्लीपर बस तिकीट दर
फेरीचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. मुंबईहून दर बुधवारी व शनिवारी सकाळी ८ वाजता फेरी सुटेल, तर विजयदुर्गहून दर गुरुवारी व रविवारी दुपारी १२ वाजता परतीची फेरी सुटेल.

Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री म्हणून विधिमंडळात ‘ग्रँड एन्ट्री’; सभागृहात सुनेत्रा पवारांना कुठे मिळाली खुर्ची?

Web Title: Reduce the ticket fare for the ro ro ferry to konkan demands the people of konkan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • Konkan
  • tourism

संबंधित बातम्या

कोणत्या स्वर्गाहून कमी नाही… समुद्राच्या आत वसलाय सुंदर देश, कुठे आहे ते जाणून घ्या
1

कोणत्या स्वर्गाहून कमी नाही… समुद्राच्या आत वसलाय सुंदर देश, कुठे आहे ते जाणून घ्या

Monsoon Tourism : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! दरडीच्या धोक्यामुळे रघुवीर घाट १० ऑगस्टपर्यंत बंद; पर्यटकांना नो-एंट्री
2

Monsoon Tourism : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! दरडीच्या धोक्यामुळे रघुवीर घाट १० ऑगस्टपर्यंत बंद; पर्यटकांना नो-एंट्री

Travel News : निवृत्तीनंतर शांत आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर परदेशातील ही 6 ठिकाणं आहेत परफेक्ट
3

Travel News : निवृत्तीनंतर शांत आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर परदेशातील ही 6 ठिकाणं आहेत परफेक्ट

भारतातील एक सरोवर जिथे पाण्यात तरंगणारे बेट बदलतात आपली जागा, हा आहे जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क
4

भारतातील एक सरोवर जिथे पाण्यात तरंगणारे बेट बदलतात आपली जागा, हा आहे जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.