Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक लाट आणि सर्व नष्ट! सागराच्या मध्यात घडलेला तो थरार, रिग कोसळली दर्यात

१५ फेब्रुवारी १९८२ रोजी Ocean Ranger या समुद्री तेल विहिरीवर भीषण दुर्घटना घडून सर्व ८४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ही अत्याधुनिक ‘सेमी-सबमर्सिबल’ रिग असूनही अटलांटिकमधील प्रचंड वादळ आणि ‘रोग वेव्ह’मुळे ती बुडाली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 02, 2026 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

१५ फेब्रुवारी १९८२ रोजी Ocean Ranger या समुद्री तेल विहिरीवर घडलेली दुर्घटना ही जगातील सर्वात भीषण औद्योगिक अपघातांपैकी एक मानली जाते. त्या काळात ही रिग अत्याधुनिक आणि अत्यंत सुरक्षित समजली जात होती. मात्र अटलांटिक महासागरातील भीषण वादळाने तिचा पूर्णपणे नाश केला आणि या दुर्घटनेत सर्व ८४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

वाढत्या कोलेस्टरॉलमुळे कोरोनरी आर्टरी डिसिजचा अनेकांच्या जीवाला धोका! ‘ही’ लक्षणे दिसताच वेळीच करा उपचार

ही रिग ‘सेमी-सबमर्सिबल’ प्रकारातील होती, जी समुद्रात तरंगत राहून खोल पाण्यात तेल उत्खनन करण्यासाठी वापरली जात होती. सुमारे १२१ मीटर लांबी आणि २५,००० टन वजन असलेली ही रचना अत्यंत मजबूत मानली जात होती. १९० किमी प्रतितास वेगाचे वारे आणि ३० मीटरपेक्षा उंच लाटा सहन करण्याची क्षमता असल्याचा दावा केला जात होता. त्यामुळेच तिला ‘अजेय’ किंवा ‘कधीही न बुडणारी’ असेही म्हटले जात होते. मात्र निसर्गाच्या शक्तीपुढे ही सर्व दावे फोल ठरले.

१४ ते १५ फेब्रुवारीच्या रात्री अटलांटिकमध्ये प्रचंड वादळ निर्माण झाले. रात्रीच्या सुमारास एका प्रचंड ‘रोग वेव्ह’ने रिगला जोरदार धडक दिली. या लाटेमुळे बॅलास्ट कंट्रोल रूमची खिडकी फुटली आणि मोठ्या प्रमाणात पाणी आत घुसले. त्यामुळे इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये बिघाड झाला आणि रिगचे संतुलन बिघडले. बॅलास्ट वॉल्व्ह अनियमितपणे काम करू लागले आणि रिग एका बाजूला झुकू लागली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर कर्मचाऱ्यांनी रिग सोडण्याचा निर्णय घेतला. रात्री १:३० वाजता शेवटचा संदेश देण्यात आला की ते लाइफबोट्समध्ये जात आहेत. मात्र वादळ इतके तीव्र होते की बचावकार्य प्रभावीपणे करता आले नाही. काही जण लाइफबोटमध्ये बसले, पण प्रचंड लाटांमुळे त्या उलटल्या. समुद्राचे तापमान अत्यंत कमी असल्याने हायपोथर्मियामुळे काही मिनिटांतच मृत्यू झाला.

या दुर्घटनेनंतर झालेल्या चौकशीत अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या. क्रू सदस्यांना आपत्कालीन परिस्थितीत बॅलास्ट सिस्टीम हाताळण्याचे पुरेसे प्रशिक्षण दिले गेले नव्हते. तसेच थंड पाण्यात टिकून राहण्यासाठी आवश्यक ‘सर्वायव्हल सूट्स’ उपलब्ध नव्हते. रिगच्या डिझाइनमध्येही काही तांत्रिक त्रुटी असल्याचे आढळले.

health Care Tips: स्थूलतेमुळे वंध्यत्वाची समस्या गंभीर! संतती सुखप्राप्तीसाठी प्रोजेनेसिसमध्ये उचित मार्गदर्शन उपलब्ध

या घटनेनंतर कॅनडामध्ये समुद्री सुरक्षा नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले. ऑफशोअर ड्रिलिंग उद्योगासाठी कडक सुरक्षा मानके लागू करण्यात आली. आज जगभरातील समुद्री तेल उत्खनन प्रकल्पांमध्ये जे नियम पाळले जातात, त्यामागे या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या ८४ लोकांचा मोठा वाटा आहे.

Web Title: Big wave accident of rig at ocean ranger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 04:15 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.