
कोलेस्टरॉलमुळे ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्या होतील मोकळ्या! रोज न विसरता आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
जीवनशैलीतील चुकीच्या सवयींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत जंक फूडचे अतिसेवन, कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप,तिखट तेलकट पदार्थ इत्यादी अनेक चुकीच्या सवयींचा परिणाम आरोग्यावर दिसून येतो. यामुळे शरीरात घाणेरडे कोलेस्ट्रॉल वाढू लागते. हृद्यासह संपूर्ण शरीरासाठी कोलेस्ट्रॉल अतिशय घातक ठरते. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेली अनावश्यक चरबी नसा हळूहळू ब्लॉक करून टाकते, ज्यामुळे रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात. शरीरात वाढलेल्या कोलेस्टरॉलमुळे हृदयाच्या आजाराचा धोका वाढतो. कोलेस्टेरॉल, फॅट्स आणि कॅल्शियमचे थर रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतात, ज्यामुळे रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात. ज्यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा स्टोक येऊन शरीराची स्थिती बिघडू शकते. त्यामुळे चुकीचा आहार न घेता पोषण आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
हार्ट ब्लॉकेज झाल्यानंतर रक्त आणि ऑक्सिजन हृदयापर्यंत व्यवस्थित पोहचत नाही. नसांमध्ये चरबी युक्त घाणेरडे पदार्थ साचून राहतात. यामुळे शरीरात थकवा वाढणे, अशक्तपणा, हातापायांमध्ये वेदना होणे इत्यादी गंभीर लक्षणे दिसून येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे रक्तातील घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. रक्तप्रवाहात निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी स्वयंपाक घरातील पदार्थ अतिशय गुणकारी ठरतात.
सकाळच्या नाश्त्यात अनेक लोक ओट्स खातात. ओट्स पचनासाठी अतिशय हलके असतात. त्यामुळे भूक लागल्यानंतर तुम्ही ओट्सचे सेवन करू शकता. ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि बीटा-ग्लुकॉन आढळून येते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते. ओट्स खाल्ल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये घाण जमा होत नाही.
महिलांच्या आरोग्यासाठी शेवग्याच्या शेंगा आणि शेवग्याची पाने वरदान ठरतात. यामध्ये असलेले पॉलीफेनॉल्स नसांना आराम देते आणि उच्च रक्तदाब वाढू देत नाही. सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात अर्धा चमचा शेवग्याची पावडर मिक्स करून प्यावी. ही पावडर नियमित खाल्ल्यास नसांमध्ये जमा झालेले ब्लॉकेज कमी होईल आणि शरीर स्वच्छ होईल.
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना लसूण वापरला जातो. लसणीत असलेले गुणधर्म आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी मधात भिजवलेली एक लसूण खाल्ल्यास शरीरातील घाण बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधारेल. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि एलिसिन नावाचा घटक रक्त पातळ करण्यास मदत करतो.
कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?
कोलेस्ट्रॉल हा रक्तातील एक मेणासारखा पदार्थ आहे, जो पेशींच्या पडद्याचा भाग बनवतो, हार्मोन्स तयार करतो आणि अन्न पचनासाठी आवश्यक पित्त तयार करण्यास मदत करतो.
कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी उपाय:
भाज्या, फळे आणि फायबरयुक्त पदार्थ जास्त खा. पुरेसे पाणी प्या, कारण कमी पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल वाढू शकते. नियमित व्यायाम करा.
कोलेस्ट्रॉलचे प्रकार:
LDL (लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन) याला ‘खराब’ कोलेस्ट्रॉल म्हणतात. रक्तातील त्याची जास्त पातळी धमण्यांमध्ये प्लेक जमा होण्यास कारणीभूत ठरते, ज्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.