Vitamin B-12 च्या कमतरतेमुळे थकवा वाढला आहे? मग आहारात करा 'या' हिरव्या पानांचे सेवन
दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी आहारात कायमच वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. शरीरात सर्वच विटामिन योग्य प्रमाणात असणे फार महत्वाचे आहे. अन्यथा संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. शरीरासाठी विटामिन बी १२ अतिशय महत्वाचे आहे. हे विटामिन नर्व्हस सिस्टिमला चांगले ठेवण्यासाठी मदत करते. यासोबतच शरीरातील लाल रक्त पेशी वाढवण्यासाठी विटामिन बी १२ आवश्यक आहे. निरोगी राहण्यासाठी शरीर स्वतः विटामिन तयार करत नाही. त्यामुळे विटामिन वाढवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर हातापायांना मुंग्या येणं, मांसपेशी कमकुवत होणं, थकवा, डोकेदुखी, चिडचिड होणं, डिप्रेशन, श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. मानसिक तणाव वाढून मेंदूचे संतुलन बिघडून जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात कोणत्या पानाच्या भाजीचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या शेवग्याच्या पानांचे सेवन करावे. या पानांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात आणि आरोग्य सुधारते. योग गुरू बाबा रामदेव यांनी विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी शेवग्याच्या पानांचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. या पानांच्या सेवनामुळे नसांमध्ये वाढलेली कमजोरी दूर होते आणि शरीर कायमच हेल्दी राहते. शेवग्याच्या पानांना आयुर्वेदामध्ये विशेष महत्व आहे. यामुळे शरीराची ऊर्जा संतुलित राहते आणि शरीर कायमच निरोगी राहते. आयुर्वेदामध्ये विटामिन बी १२ वाढवण्यासाठी शेवगा. शेवग्याच्या शेंगा किंवा शेवग्याच्या पानांचे सेवन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
शेवग्याच्या पानांमध्ये आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम, बी- कॉम्पेलेक्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. विटामिन बी १२ शरीरासाठी रक्त तयार करते. या पानांच्या सेवनामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. शेवग्याची पाने खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते. शरीरात वाढलेली ऍसिडिटी, बद्धकोष्ठता आणि पचनाच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी शेवग्याच्या पानांची पावडर कोमट पाण्यात मिक्स करून प्यावी. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. आतड्यांमधील हालचाल सुलभ होण्यासाठी कोमट पाण्यात मोरिंगा पावडर मिक्स करून प्यावी.
तुमचे लिव्हर सडले आहे का? शरीर देतो ‘हे’ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष अन्यथा मृत्यू देईल भेट
शेवग्याच्या पानांचे सेवन केल्यामुळे मेंदूचे कार्य कायमच निरोगी राहते. एकाग्रता आणि मानसिक संतुलन वाढण्यासाठी शेवग्याच्या शेंगाचे सेवन करावे. शेवग्याच्या पानांमध्ये केरसेटिन आणि क्लोरोजेनिक ऍसिड मोठ्या प्रमाणावर आढळून येते. यामुळे न्युरॉनचा डॅमेजपासून बचाव होतो.हार्मोन्स संतुलित राहण्यासाठिव शेवग्याच्या पानांचे सेवन करावे.
व्हिटॅमिन बी12 म्हणजे काय?
व्हिटॅमिन बी12 हे शरीरासाठी एक आवश्यक जीवनसत्व आहे जे ऊर्जा निर्मिती, डीएनए संश्लेषण आणि मज्जासंस्थेच्या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
व्हिटॅमिन बी12 कुठे आढळते?
मांस, मासे, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ हे बी12 चे उत्तम स्रोत आहेत.काही तृणधान्ये आणि वनस्पती दूध उत्पादने यांमध्ये बी12 मिसळलेले (fortified) असू शकते.






