हिवाळ्यात वारंवार होणाऱ्या सर्दी खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश
ऑक्टोबर हिट नंतर राज्यात काहीशी थंडी जाणवू लागली आहे. पण वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे कधी ऊन तर कधी पाऊस अशी स्थिती राज्यभरात सगळीकडे निर्माण झाली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची जास्त काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. कारण थंड वातावरणामुळे सगळीकडे साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर पसरू लागतात. सर्दी, खोकला, ताप इत्यादीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. ज्यामुळे थकवा, अशक्तपणा वाढतो. जास्तच थंडी वाजू लागल्यानंतर उबदार कपडे घातले जाते. पण शरीर आतून उष्ण ठेवण्यासाठी कायमच चहाचे सेवन केले जाते. पण वारंवार चहा पिणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात उबदारपणा कायम टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्य सुधारते.(फोटो सौजन्य – istock)
शरीरासाठी लसूण अतिशय गुणकारी ठरते. वर्षाच्या बाराही महिने आहारात लसूणचे सेवन करावे. जेवणातील पदार्थ बनवताना लसूणचा वापर केला जातो.यामुळे पदार्थाची चव आणि सुगंध वाढतो. थंडीच्या दिवसांमध्ये कच्चा लसूण खाण्याचा सल्ला डॉक्टरसुद्धा देतात. यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते, रोगप्रतिकारशक्ती सुधारते, इन्फेक्शनपासून शरीराचा बचाव होतो आणि बद्धकोष्ठता कमी होते. तसेच आठवड्यातून एकदा किंवा दोनदा लसूण काढा बनवून प्यावा.
हिवाळ्यात गूळ खावे. गूळ खाल्ल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. गूळ हा उष्ण पदार्थ आहे. सर्दी खोकला अशा अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी गुळाचे सेवन करावे. साखरेचे चहा पिण्याऐवजी गुळाचा चहा प्यावा. तसेच चिक्की, लाडू किंवा गुळापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती निरोगी राहील.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं सुका मेवा खायला आवडतो. काजू, बदाम, मनुके, अंजीर, पिस्ता इत्यादी अनेक पदार्थ खाल्ले जातात. यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते. सुक्या मेव्यामध्ये विटामिन ई, बी कॉम्प्लेक्स, मॅग्नेशिअम, कॉपर, झिंक, कॅल्शिअम आणि इतरही हेल्दी प्रोटीन इत्यादी अनेक घटक आढळून येतात.
शरीराची कमकुवत झाली रोगप्रतिकारशक्ती सुधरण्यासाठी आलं खावे. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आल्याच्या रसाचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल आणि पचनक्रिया निरोगी राहील. सर्दी, खोकला, घशात खवखव, इन्फेक्शन, ताप इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आलं खावे.
हिवाळ्यात कोणते पदार्थ खाणे महत्त्वाचे आहे?
गूळ शरीराला उष्णता देतो आणि तिळाच्या सेवनाने ऊर्जा मिळते.मेथीमध्ये लोह, फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. मेथीचे पराठे, भाजी किंवा मेथीचे लाडू खाणे हिवाळ्यात फायदेशीर असते.
हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवणारे पदार्थ कोणते?
भाज्यांचे सूप शरीराला उष्णता देते आणि पोषक तत्वे प्रदान करते.आले आणि लसूण हे दोन्ही पदार्थ सर्दी, खोकला आणि पचनाच्या तक्रारींपासून बचाव करतात. चहामध्ये आले घालणे खूप फायदेशीर ठरते.
हिवाळ्यात भाज्या खाण्याचे काय फायदे आहेत?
हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे, जीवनसत्त्वे (ए, सी, के), खनिजे आणि फायबर असतात.गाजर, बीट यांसारख्या भाज्यांमधील बीटा-कॅरोटीन आणि जीवनसत्त्वे त्वचेचे आरोग्य चांगले ठेवतात.






