Budget Travel : ५०० रुपयांत आश्रमात राहण्याची सोय, ५० रुपयांत जेवण, अशा प्रकारे करा ऋषिकेश ट्रिपचे नियोजन
सध्या हवामान खूपच आल्हाददायक झाले आहे. अनेकजण सहलीचं नियोजन करत आहेत, आणि त्यात भर म्हणजे पुढच्या आठवड्यात सलग तीन दिवसांची सुट्टी येतेय. अशा वेळी प्रवासाची संधी कोणीही दवडू इच्छित नाही. जर तुम्हालाही थोडं फिरून यायचं असेल, तर दिल्लीपासून अवघ्या 4-5 तासांच्या अंतरावर असलेलं ऋषिकेश हे एक उत्तम ठिकाण आहे. विशेषतः तरुणांमध्ये ही जागा फारच लोकप्रिय आहे.
स्वस्तात पूर्ण होईल गोव्याची सफर; या सीजनमध्ये करा ट्रिप प्लॅनिंग; किमती होतात अर्ध्याहून कमी
जर तुम्ही पुढच्या सुट्यांमध्ये कुठे जायचा विचार करत असाल, तर ऋषिकेशचा पर्याय तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. इथे तुम्हाला स्वस्त, सुंदर आणि मन शांत करणारा अनुभव तुम्हाला मिळेल! ऋषिकेशमध्ये प्रवास फार खर्चिक नाही, आणि जर तुम्ही अत्यंत माफक बजेटमध्ये ही सहल करायची असेल, तर आम्ही तुम्हाला राहण्यासाठी आणि खाण्यासाठी काही भन्नाट पर्याय सांगणार आहोत.
लक्ष्मण झुल्याजवळ स्वस्त हॉस्टेल्स
ऋषिकेशमध्ये लक्ष्मण झुल्याजवळ असंख्य हॉस्टेल्स आहेत, जी स्वस्तात आणि आरामदायक राहणीसाठी प्रसिद्ध आहेत. झुल्यापासून साधारणपणे 5 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या या ठिकाणी तुम्हाला गंगेचा आणि शहराचा सुंदर नजारा पाहायला मिळेल. येथे योगाभ्यास करण्याचीही उत्तम सोय आहे.
खाण्यापिण्यासाठी चवदार आणि स्वच्छ जेवण उपलब्ध आहे. एका बेडसाठी दररोज फक्त ₹500 इतका खर्च येतो.
गो स्टॉप्स : परवडणार आणि सोयीस्कर
गो स्टॉप्स हे ऋषिकेशमधील लोकप्रिय हॉस्टेल असून, पतंजली योग केंद्रासोबतच लक्ष्मण झुला आणि राम झुल्यापासूनही अगदी जवळ आहे. हे ठिकाण बजेटमध्ये राहण्यासाठी उत्कृष्ट असून, येथे स्वच्छ आणि रुचकर अन्नाचीही सोय आहे. येथे एक बेड केवळ ₹300 मध्ये उपलब्ध आहे.
‘हॉस्टलर’ : आराम आणि निसर्गाच्या सानिध्यात
‘हॉस्टलर’ हे ऋषिकेशमध्ये प्रवाशांसाठी आणखी एक उत्तम पर्याय आहे. येथील प्रत्येक खोलीतून तुम्हाला डोंगरदऱ्यांचे मोहक दृश्य दिसेल. खाण्याच्या बाबतीतही येथे उत्तम सोय आहे. हॉस्टेलजवळच एक मोठं मैदान आहे, जिथे विविध प्रकारच्या अॅक्टिव्हिटीज करता येतात. येथे एका खोलीचं भाडं प्रति रात्र ₹500 आहे. शांतता आणि निसर्गसौंदर्य एकत्र हवे असेल, तर हे ठिकाण परफेक्ट आहे.
ऋषिकेशचे सुप्रसिद्ध छोले भटूरे
जर तुम्हाला स्थानिक चव अनुभवायची असेल, तर त्रिवेणी घाट रोडवर असलेली ‘हीराभाई’ ची छोले भटुरेची जुनी दुकान नक्की भेट द्या. 58 वर्षांपासून चालू असलेली ही दुकान सकाळी 6 वाजता उघडते आणि दुपारी 1 वाजेपर्यंत येथे मोठी गर्दी पाहायला मिळते. विशेषतः शुक्रवार आणि शनिवार हे दिवस खूपच गजबजलेले असतात. केवळ ₹50 मध्ये मिळणारे छोले भटूरे इतके स्वादिष्ट असतात की पुन्हा पुन्हा खावंसं वाटेल.
‘गुरु कृपा’ चे प्रसिध्द छोले कुलचे
पुष्कर मंदिर रोडवर, स्थानिक पोलीस ठाण्याजवळ असलेला “गुरु कृपा छोले कुलचे” चा स्टॉल गेली 26 वर्षे लोकांचं प्रेम मिळवत आहे. येथे तुम्हाला गरम गरम चण्याचा सूपसह स्वादिष्ट कुलचे मिळतात. विशेष म्हणजे हे सर्व पारंपरिक पानात दिलं जातं. फक्त ₹50 मध्ये मिळणारा हा संपूर्ण प्लेट तुमचं पोट आणि मन दोन्ही भरतो. हा स्टॉल दररोज सकाळी 8 ते संध्याकाळी 4 पर्यंत सुरू असतो.
ऋषिकेशबद्दलच्या मनोरंजक गोष्टी कोणत्या आहेत?
इथे नदीच्या काठावर असंख्य मंदिरे आणि आश्रम बांधलेले आहेत.
ऋषिकेशला जाणे कधी टाळावे?
पावसाळ्यात ऋषिकेशला जाणे टाळावे असा सल्ला दिला जातो.