जगातील टॉप 10 डिशेसमध्ये बटर गार्लिक नानचा समावेश
भारत फिरण्यासाठी आणि इथे असलेली खाद्यसंस्कृतीची चव घेण्यासाठी जगभरातील अनेक पर्यटक दरवर्षी भारतामध्ये येतात. भारतामध्ये असे अनेक पदार्थ ज्यांची चव जगात कुठेच नाही. नुकतीच जगातील 100 सर्वोत्कृष्ट पदार्थांची यादी जाहीर करण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये भारतातील 4 पदार्थांचा समावेश असल्याने सगळीकडे भारतामध्ये असलेल्या खाद्यसंस्कृतीचे कौतुक केले जात आहे. भारतामधील वेगवेगळे राज्यामध्ये अनेक पदार्थ मिळतात. सर्वोत्कृष्ट 100 पदार्थांच्या यादीमधून टॉप 10 पदार्थांच्या यादीमध्ये भारतातील बटर गार्लिक नानचे नाव आहे. हा पदार्थ भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो.
टेस्ट ॲटलस कडून जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये बटर गार्लिक नानाचे नाव आहे. टॉप 10 पदार्थांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर ब्राझीलची पिकान्हा, दुसऱ्या क्रमांकावर मलेशियाची रोटी कनई आणि तिसऱ्या क्रमांकावर थायलंडची फाट काफ्राओ आहे. तर सातव्या स्थानी भारताच्या बटर गार्लिक नानचे नाव आहे. बटर गार्लिक नान व्यतिरिक्त अजूनही 3 पदार्थाचे नाव यादीमध्ये आहे. त्यातील एक म्हणजे मुरघ माखनी, टिक्का, तंदूरी. जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये भारतातील 4 पदार्थांचे नाव असल्याने अनेक लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. बटर गार्लिक नान हा पदार्थ तुम्ही सोप्या पद्धतींमध्ये घराच्या घरी देखील बनवू शकता.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: रात्री झोपण्यापूर्वी खा 1 लसणाची पाकळी, फायदेच फायदे..
जगातील टॉप 10 डिशेसमध्ये बटर गार्लिक नानचा समावेश
भारतातील 4 पदार्थानी Taste Atlas या प्रसिद्ध ऑनलाइन फूड रँकिंग प्लॅटफॉर्मने जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये नाव मिळवल्याने सगळीकडे आनंद व्यक्त केला जात आहे.बटर नान तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरीसुद्धा बनवू शकता. चला तर जाऊन घेऊया रेसिपी. सर्वप्रथम मैद्याच्या पीठात चवीनुसार मीठ घालून त्यानंतर त्यात गरजेनुसार पाणी घालून मळून घ्या. मळून झाल्यानंतर 10 मिनिटं पीठ बाजूला ठेवा. नंतर छोटे छोटे गोळे करून पिठाचे नान तयार करून त्यावर बारीक चिरलेली लसूण लावूनतंदूर भट्टीमध्ये किंवा तवा उलटा करून भाजा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवला जाणारा बटर गार्लिक नान. हा पदार्थ तुम्ही कोणत्याही चिकन किंवा व्हेज ग्रेव्हीसोबत खाऊ शकता.