फोटो सौजन्य: Freepik
बदलत्या लार्फस्टाइल आणि चुकीच्या खानपानामुळे अनेक आरोग्यासंबंधित समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. यातही विशेष करून हार्ट अटॅकची समस्या अनेकांना धडकी भारत आहे. पूर्वी फक्त जेष्ठांमध्ये हार्ट अटक येत होता परंतू आज कित्येक तरुणांमध्ये हार्ट अटॅकच्या समस्या वाढताना दिसत आहे.
हार्ट अटॅक अनेकदा प्राणघातक ठरतो. त्यामुळेच हार्ट अटॅक आल्यास डॉक्टर रुग्णाला प्रथमोपचार करून ताबडतोब रुग्णालयात नेण्याचा सल्ला देतात. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असे म्हटले जात आहे की हार्ट अटॅक आल्यास रुग्ण मोठ मोठ्याने खोकून स्वतःचा जीव वाचवू शकतो. या प्रक्रियेला कफ सीपीआर असे नाव देण्यात आले आहे.
पण खरंच असं आहे का? जर हे सत्य असेल तर डॉक्टर या संदर्भात काय म्हणतात? हार्ट अटॅकच्या संदर्भात सोशल मीडियावर केल्या जात असलेल्या या दाव्यात किती तथ्य आहे ते जाणून घेऊया.
हे देखील वाचा: Heart Attack आल्यावर फक्त छातीत दुखत नाही, तर ‘या’ भागात सुद्धा होतात वेदना
या व्हायरल पोस्टमध्ये असे सांगितले होते की छातीत दुखत असेल किंवा जबड्यात दुखत असेल तर हार्ट अटॅक असू शकतो. या काळात, मदतीसाठी कोणीही उपस्थित नसल्यास, व्यक्तीने जोरदार खोकला आणि दीर्घ श्वास घ्यावा. असे केल्याने फुफ्फुसांना ऑक्सिजन मिळेल आणि जीव वाचू शकेल.
या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. हा खोटा आणि दिशाभूल करणारा दावा आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान, मोठ मोठ्याने खोकून रुग्णाचा जीव नाही वाचवता येत. तसेच वेगाने श्वास घेण्याचाही काही फायदा होत नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कफ सीपीआर सारखी कोणतीही मेडिकल टर्म नाही ज्याद्वारे रुग्णाचा जीव वाचू शकतो.
हे देखील वाचा: काय आहे Mild Heart Attack? 5 लक्षणांनी ओळखा आणि मृत्यू टाळा
या पूर्वीही सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट व्हायरल झाली होती, ज्यामध्ये हृदयविकाराचा झटका आल्यास आले खाल्ल्याने जीव वाचू शकतो, असे म्हटले होते. अशा कोणत्याही दाव्यांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
हार्ट अटॅक ही एक गंभीर स्थिती आहे. या आजारबाबत ऐकलेल्या किंवा लिहिलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्याआधी रुग्णाला प्रशिक्षित व्यक्तीकडून सीपीआर द्यावा आणि शक्य असल्यास त्याला ताबडतोब रुग्णालयात घेऊन जावे.