फोटो सौजन्य: Freepik
सध्याच्या पळापळीच्या जीवनात आपली जिवनशैली आणि आहाराच्या सवयी सुद्धा बदलत आहे, ज्याचा परिणाम आपल्या शरीरावर परिणाम होताना दिसत आहे. यातील सर्वात मोठा परिणाम हा आपल्या हृदयावर होत असतो, ज्यामुळे हार्ट अटॅकची समस्या उद्भवू शकते.
हार्ट अटॅक ही एक ही एक गंभीर स्थिती आहे, ज्यामध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमधील अडथळ्यामुळे हृदयाला योग्य प्रमाणात रक्त आणि ऑक्सिजन मिळत नाही. गेल्या काही वर्षात हार्ट अटॅकबद्दल जी जनजागृती झाली आहे ती खरंच उल्लेखनीय आहे. पण आजही अनेक लोकांना या आजाराबद्दल पुरेशी माहिती नाही.
हे देखील वाचा: पायातील ‘हे’ बदल म्हणजे हार्ट अटॅकची लक्षणं! वेळीच रहा सावध
कित्येक जणांना असे वाटते की हार्ट अटॅकच्या वेदना या फक्त छातीत होत असतात, जे अर्धसत्य आहे. हृदयविकाराचा झटका केवळ छातीतच नाही तर शरीराच्या इतर भागातही येऊ शकतो. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
हात: हार्ट अटॅकच्या दरम्यान वेदना अनेकदा डाव्या हाताला जाणवते, परंतु हे दोन्ही हातांमध्ये देखील होऊ शकते. काही लोकांना खांदे आणि कोपरांमध्येही वेदना जाणवू लागते.
पाठ: कधीकधी हृदयविकाराचा त्रास पाठीच्या वरच्या भागातही जाणवतो. हा स्नायूंचा ताण आहे असे समजून लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.
मान आणि जबडा: हार्ट अटॅकच्या दरम्यान मान आणि जबड्यात देखील वेदना होऊ शकतात. हे दुखणे दात दुखल्या सारखे वाटू शकते.
पोट: हार्ट अटॅकच्या दरम्यान काही लोकांना पोटाच्या वरच्या भागात वेदना आणि जळजळ देखील जाणवते, जी बहुतेकदा गॅस्ट्रिक समस्या मानली जाते.
श्वास घेण्यास त्रास होणे, घाम येणे किंवा वरीलपैकी कोणत्याही भागात अचानक तीव्र वेदना जाणवत असेल तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. हार्ट अटक ही एक मेडिकल इमर्जन्सी आहे, जिला वेळेवर उपचार मिळाल्यास एखाद्याचा जीवसुद्धा वाचू शकते. त्यामुळे जर तुम्हाला हार्ट अटॅकची लक्षणे जाणवत असतील तर केवळ छातीत दुखणे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका. शरीराच्या इतर भागात दुखणे देखील हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते.