Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ukhane For New Bride: सोन्याची नथ आणि हिरवी साडी…! लग्नसोहळ्यात नववधूसाठी भन्नाट उखाणे, शब्दांनीच जिंकाल साऱ्यांचे मन

महाराष्ट्रीय परंपरेमध्ये हिंदू विवाह सोहळ्याला विशेष महत्व आहे. विवाह सोहळा पार पडल्यानंतर नववधू आणि नवदेव दोघेही उखाणे घेतात. चला तर पाहुयात नववधूसाठी भन्नाट उखाणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 27, 2026 | 02:19 PM
लग्नसोहळ्यात नववधूसाठी भन्नाट उखाणे, शब्दांनी जिंकलं साऱ्यांचे मन

लग्नसोहळ्यात नववधूसाठी भन्नाट उखाणे, शब्दांनी जिंकलं साऱ्यांचे मन

Follow Us
Follow Us:

प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अतिशय आनंदाचा आणि अविस्मरणीय दिवस म्हणजे लग्न.लग्नाच्या दोन ते तीन महिने आधीपासून दागिन्यांची खरेदी, कपडे इत्यादी अनेक गोष्टींची तयारी केली जाते. हिंदू संस्कृतीमध्येविवाह सोहळ्याला विशेष महत्व आहे. लग्नात फॉलो केल्या जाणाऱ्या प्रथा आणि परंपरा पूर्वीच्या काळापासून सुरु आहेत. लग्नात उखाणा घेण्याला सुद्धा विशेष महत्व आहे. नववधू असो किंवा नवरदेव दोघांसुद्धा उखाणा घ्यावा लागतो. पण बऱ्याचदा घाईगडबडीमुळे उखाणा लक्षात राहत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे मजेदार उखाणे तुम्ही नक्कीच घेऊ शकता. वाचा नववधूसाठी स्पेशल उखाणे.

खाण तशी माती, राव माझे पती… वाचा नवरीसाठीचे खास उखाणे – Navarashtra

चांदण्यांनी सजली रात्र, फुलांनी सजला बाग, ….रावांचं नाव घेते, माझं भाग्यच लागलं जाग!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, पिवळ्या रंगाची साडी,…रावांसोबत सुरू झाली, जीवनयात्रा गोड गाठी!

मोबाईलवर रील्स आणि फोटोचा पोज,… रावांचं नाव घेते, बाकी सगळे म्हणतात व्वा रोज!

खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,
… रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद

कपाळावर कुंकू, हिरवा चुडा हाती,
…राव माझे पती, सांगा माझे भाग्य किती

राज हंस पक्षी शोभा देतो वनाला,
… रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला

मंदिरात वाहते, फुल आणि पान,
… रावांचे नांव घेते, ठेवून सर्वांचा मान

लावीत होते कुंकू, त्यात पडला मोती,
…रावां सारखे मिळाले पती, भाग्य मानू किती

गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेंदी,
…रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी

डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल,
.. रावांच्या नावाने कुंकू लावते लाल

कपाळाचं कुंकू, जसा चांदण्यांचा ठसा,
… रावांचे नांव घेते, सारे जण बसा

मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
… रावांच नाव घेते नीट लक्ष ठेवा

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
… रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने

पंच पक्वान्नाच्या ताटात, वाढले लाडू पेढे,
… रावांचे नांव घेताना, कशाला आढे वेढे

मंदिराचे वैभव, परमेश्वराची मूर्ती,
… रावांचे नांव घेऊन करते इच्छापूर्ती

माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने,
.. राव आहेत सोबत, मग मला कशाचे उणे

संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,
… रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला

अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस,
… रावांच नांव घेताना, कसला आला आळस

पतिव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते,
… रावांचे नांव घेताना, आशीर्वाद मागते

ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल,
… रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल

लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा,
… रावांचे नांव घेऊन उरवाना करते पुरा

पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,
… रावांच्या नावाने घालते मंगल सूत्रांचा हार

आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे,
… राव हेच माझे अलंकार खरे

अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी,
आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे..रावांची राणी

सावित्रीने नवस केला-पती मिळावा सत्यवान,
… रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान

दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,
…चे नाव घेते तुमच्या साठी!

श्रीकृष्णाने पण केला, रुक्मिणीलाच वरीन,
… रावांच्या जीवनात आदर्श संसार करीन

घातली मी वरमाला हसले… राव गाली,
थरथरला माझा हात लाजेने चढली लाली

जेव्हा मी ह्यांना पाहते चोरून विचार करते मूक होऊन,
घडविले दैवांनी… रावांना जीव लावून

हृदयात दिले स्थान, तेव्हा दिला हातात हात,
… रावांच्या जीवनात लाविते प्रीतीची फुलवत

राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार,
… रावांनी घातला मला मंगळ सूत्राचा हार

पार्वती ने पण केला महादेवालाच वरीनं,
…रावांच्या साथीनं, आदर्श संसार करीन

चांदीचे जोडवे पतीची खूण,
.. रावांचे नांव घेते,… ची सून

गुलाबाचे फुल दिसायला ताजे,
… रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे

डाळिंबाचे झाड, पानोपानी दाटले,
… रावांचे नांव घेताना, आनंदी मला वाटले

चंदेरी सागरात, रुपेरी लाटा,
… रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा

नाजुक अनारसे साजुक तुपात तळावे,
…रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे

स्वातंत्र्याच्या होमकुंडात वीरांनी घेतली उडी,
…रावाच्या नावाने घालते गळ्यात मंगळ सूत्राची जोडी

…रावांच्या नावाने, भरला हिरवा चुडा,
त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडा

तळहातावर मेंदी रचली, त्यावर तेल ही शिंपडले,
…रावांचे मन, मी केव्हाच जिंकले

मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले,
… रावांचे हेच रूप मला फार आवडले

मला गुणवान पती मिळाले, याचा वाटतो प्रत्येकीला हेवा,
…राव माझ्या जीवनातील मौल्यवान ठेवा

शिक्षणाने विकसीत होते, संस्कारित जीवन,
…रावांच्या संसारात राखीन मी सर्वांचे मन

प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची,
…रावांच्या साथीने सुरवात करते सहजीवनाची

चंद्राचा झाला उदय अन् समुद्राला आली भरती,
…रावांच्या प्रेमाने सर्व दुःख हरती

नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार,
… रावांचा स्वभाव आहे फारच उदार

करवंदाची साल चंदनाचे खोड,
… रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड

सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले,
… रावांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले

सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले,
…रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले

प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतीची वात,
…रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात

शुभमंगल प्रसंगी अक्षता पडतात माथी,
आता ….राव माझे जीवनसाथी

मंगलसुत्रातील दोन वाट्या सासर आणी माहेर,
…रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर

…रावां सारखे मिळाले पती, भाग्य मानू किती

गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेंदी,
…रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी

डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल,
.. रावांच्या नावाने कुंकू लावते लाल

कपाळाचं कुंकू, जसा चांदण्यांचा ठसा,
… रावांचे नांव घेते, सारे जण बसा

मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
… रावांच नाव घेते नीट लक्ष ठेवा

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
… रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने

पंच पक्वान्नाच्या ताटात, वाढले लाडू पेढे,
… रावांचे नांव घेताना, कशाला आढे वेढे

मंदिराचे वैभव, परमेश्वराची मूर्ती,
… रावांचे नांव घेऊन करते इच्छापूर्ती

माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने,
.. राव आहेत सोबत, मग मला कशाचे उणे

संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,
… रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला

अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस,
… रावांच नांव घेताना, कसला आला आळस

पतिव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते,
… रावांचे नांव घेताना, आशीर्वाद मागते

ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल,
… रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल

लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा,
… रावांचे नांव घेऊन उरवाना करते पुरा

पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,
… रावांच्या नावाने घालते मंगल सूत्रांचा हार

आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे,
… राव हेच माझे अलंकार खरे

अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी,
आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे..रावांची राणी

सावित्रीने नवस केला-पती मिळावा सत्यवान,
… रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान

दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,
…चे नाव घेते तुमच्या साठी!

श्रीकृष्णाने पण केला, रुक्मिणीलाच वरीन,
… रावांच्या जीवनात आदर्श संसार करीन

घातली मी वरमाला हसले… राव गाली,
थरथरला माझा हात लाजेने चढली लाली

जेव्हा मी ह्यांना पाहते चोरून विचार करते मूक होऊन,
घडविले दैवांनी… रावांना जीव लावून

हृदयात दिले स्थान, तेव्हा दिला हातात हात,
… रावांच्या जीवनात लाविते प्रीतीची फुलवत

राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार,
… रावांनी घातला मला मंगळ सूत्राचा हार

पार्वती ने पण केला महादेवालाच वरीनं,
…रावांच्या साथीनं, आदर्श संसार करीन

चांदीचे जोडवे पतीची खूण,
.. रावांचे नांव घेते,… ची सून

गुलाबाचे फुल दिसायला ताजे,
… रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे

डाळिंबाचे झाड, पानोपानी दाटले,
… रावांचे नांव घेताना, आनंदी मला वाटले

चंदेरी सागरात, रुपेरी लाटा,
… रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा

नाजुक अनारसे साजुक तुपात तळावे,
…रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे

स्वातंत्र्याच्या होमकुंडात वीरांनी घेतली उडी,
…रावाच्या नावाने घालते गळ्यात मंगळ सूत्राची जोडी

…रावांच्या नावाने, भरला हिरवा चुडा,
त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडा

तळहातावर मेंदी रचली, त्यावर तेल ही शिंपडले,
…रावांचे मन, मी केव्हाच जिंकले

मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले,
… रावांचे हेच रूप मला फार आवडले

मला गुणवान पती मिळाले, याचा वाटतो प्रत्येकीला हेवा,
…राव माझ्या जीवनातील मौल्यवान ठेवा

शिक्षणाने विकसीत होते, संस्कारित जीवन,
…रावांच्या संसारात राखीन मी सर्वांचे मन

प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची,
…रावांच्या साथीने सुरवात करते सहजीवनाची

चंद्राचा झाला उदय अन् समुद्राला आली भरती,
…रावांच्या प्रेमाने सर्व दुःख हरती

नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार,
… रावांचा स्वभाव आहे फारच उदार

करवंदाची साल चंदनाचे खोड,
… रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड

सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले,
… रावांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले

सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले,
…रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले

प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतीची वात,
…रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात

शुभमंगल प्रसंगी अक्षता पडतात माथी,
आता ….राव माझे जीवनसाथी

मंगलसुत्रातील दोन वाट्या सासर आणी माहेर,
…रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर

चांदण्यांनी सजली रात्र, फुलांनी सजला बाग,
___रावांचं नाव घेते, माझं भाग्यच लागलं जाग.

नववधूसाठी हटके उखाणे, नवऱ्यासह सासरची मंडळीही होतील खूष; होईल नव्या …

सोन्याची नथ आणि हिरवी साडी,
___रावांसोबत सुरू झाली जीवनयात्रा गोड गाठी.

सकाळचा सूर्य आणि फुलांचा सुवास,
___रावांचं नाव घेते, आयुष्यभर असो साथ खास.

गुलाबाच्या फुलाला आहे सुगंध भारी,
___रावांचं नाव घेते, मी झाले त्यांची लाडकी नारी.

तिचं हसू गोड साखरेसारखं,
___चं नाव घेतो, आयुष्य झालं सोन्यासारखं.

 

Web Title: Catchy marathi wedding ukhane for brides charming lines to win everyones heart

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • Hindu Marriage
  • lifestyle news
  • Wedding Season

संबंधित बातम्या

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!
1

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist
2

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
3

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक
4

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.