Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटात गाठी होण्याची कारणे आणि लक्षणे; वेळेत उपचार का आवश्यक? जाणून घ्या

पोट किंवा आतड्यात गाठी होण्याची कारणे विविध असून त्यामागे गॅस्ट्रिक पॉलीप्स, हार्निया, लिव्हर वाढणे, ओव्हेरियन सिस्ट किंवा कॅन्सर यांसारख्या समस्या असू शकतात. योग्य वेळी निदान व उपचार केल्यास गंभीर परिणाम टाळता येतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 22, 2025 | 09:18 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत असून दरवर्षी मोठ्या संख्येने लोक कॅन्सरमुळे प्राण गमावत आहेत. मात्र, कॅन्सर योग्य वेळी ओळखल्यास त्यावर उपचार करणे शक्य असते. कधी कधी पोट किंवा आतड्यात गाठ तयार होणे याचा अर्थ थेट कॅन्सर असेच समजले जाते, परंतु असे नेहमीच नसते. पोट आणि आतड्यात गाठ तयार होण्यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात. यामुळे या गाठींचे कारण, स्वरूप आणि त्याचा संभाव्य परिणाम समजून घेणे महत्त्वाचे ठरते. गॅस्ट्रिक पॉलीप्स हा पोटात गाठ तयार होण्यामागील एक सामान्य प्रकार आहे. या गाठी पोटाच्या आतल्या अस्तरावर तयार होतात आणि सहसा हानिकारक नसतात. मात्र, काही वेळा या गाठी कॅन्सरमध्ये रूपांतरित होऊ शकतात. याशिवाय, कॅन्सर हे देखील पोट किंवा आतड्यात गाठी तयार होण्याचे एक महत्त्वाचे कारण असू शकते. कॅन्सरमुळे तयार होणाऱ्या गाठी सुरुवातीला लक्षणे दाखवत नाहीत, त्यामुळे त्याचे निदान लवकर होणे कठीण ठरते.

विटामिन बी 12 ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा मुगाच्या खिचडीचे सेवन, वाचा सोपी रेसिपी

हार्निया हा आणखी एक सामान्य कारण आहे ज्यामुळे पोट आणि आतड्यात गाठी तयार होतात. पोटाच्या भिंती कमकुवत झाल्यामुळे आतड्याचा किंवा इतर मऊ ऊतकांचा काही भाग बाहेर येतो, ज्यामुळे गाठ तयार होते. याशिवाय, लिव्हर मोठा होणे हा देखील गाठी तयार होण्याचा एक कारणीभूत घटक आहे. लिव्हर सिरोसिस, कॅन्सर किंवा सूज यामुळे लिव्हरची समस्या गंभीर होऊ शकते. सुरुवातीला याची लक्षणे स्पष्ट दिसत नाहीत, परंतु वेळीच उपचार न झाल्यास ती समस्या वाढू शकते.

महिलांमध्ये आढळणारी ओव्हेरियन सिस्ट ही समस्या देखील पोट आणि आतड्यात गाठी तयार होण्यास कारणीभूत ठरते. अंडाशयामध्ये तयार होणाऱ्या या सिस्टमुळे महिलांना विविध प्रकारचे त्रास जाणवू शकतात. यामध्ये मासिक पाळी अनियमित होणे, पोटात ताण किंवा अस्वस्थता जाणवणे, तसेच काही वेळा तीव्र वेदनाही समाविष्ट असतात. या सिस्टमुळे पचनक्रियेत बिघाड होऊ शकतो, तसेच पोटात गाठीसारखा गोळा तयार होतो, जो बऱ्याच वेळा स्पष्टपणे जाणवत असतो. काही महिलांना गाठीमुळे पाठीचे दुखणे किंवा कंबरदुखीही जाणवते, ज्यामुळे दैनंदिन कामकाजामध्ये अडथळा निर्माण होतो. पोट आणि आतड्यात गाठी तयार झाल्यास काही ठळक लक्षणे दिसू शकतात. यामध्ये पोटात सूज येणे, पोट बाहेर मोठे दिसणे, तसेच खोकताना, वाकताना किंवा वजन उचलताना वेदना होणे यांचा समावेश होतो. याशिवाय, काही महिलांना अपचन, वारंवार लघवी लागणे किंवा थकवा जाणवणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास समस्या गंभीर होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या लक्षणांची वेळेत दखल घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

काखेतील काळेपणामुळे आत्मविश्वास कमी झाला आहे? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा, काख होईल स्वच्छ

पोट किंवा आतड्यात गाठी तयार होण्याच्या समस्यांचा सामना करण्यासाठी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वेळेत निदान आणि उपचार न झाल्यास ही समस्या अधिक गुंतागुंतीची होऊ शकते. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या गाठींचे स्वरूप आणि कारण समजणे आता सोपे झाले आहे, त्यामुळे योग्य उपचारांची शिफारस करता येते. लवकर निदान होऊन योग्य उपचार मिळाल्यास या समस्येवर नियंत्रण मिळवता येते आणि गंभीर परिणामांपासून स्वतःला वाचवता येते. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय मदत घेणेच श्रेयस्कर ठरते.

Web Title: Causes and symptoms of stomach lumps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2025 | 09:18 PM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

नाश्त्यात Eggs खाताय तर व्हा सावध! FSSAI ने जारी केला अलर्ट; अंड्यात आढळले कॅंसर जन्माला घालणारे धोकादायक तत्व
1

नाश्त्यात Eggs खाताय तर व्हा सावध! FSSAI ने जारी केला अलर्ट; अंड्यात आढळले कॅंसर जन्माला घालणारे धोकादायक तत्व

How Much Fart In A Day: 15, 20 की 30? एका दिवसात किती वेळा पादणं आहे नॉर्मल, Gut Health सह थेट संबंध
2

How Much Fart In A Day: 15, 20 की 30? एका दिवसात किती वेळा पादणं आहे नॉर्मल, Gut Health सह थेट संबंध

WHO ग्लोबल समिटमध्ये PM Modi यांनी केला अश्वगंधाचा उल्लेख, आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे ‘हे’ औषध
3

WHO ग्लोबल समिटमध्ये PM Modi यांनी केला अश्वगंधाचा उल्लेख, आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे ‘हे’ औषध

Periodontitis: जबडा सडवू शकतो ‘हा’ आजार, 32 दात तुटण्याआधी त्वरीत करा 5 कामं
4

Periodontitis: जबडा सडवू शकतो ‘हा’ आजार, 32 दात तुटण्याआधी त्वरीत करा 5 कामं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.