
गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा 'या' गोष्टी
Recipe : व्हेज लव्हर्ससाठी खास, घरी बनवा हाॅटेल स्टाईल टेस्टी पनीर बिर्याणी
आल्याची गोळी
आले हे नैसर्गिकरित्या मळमळ दूर करण्यास मदत करते. याच जिंजरोल आढळले जाते, जे पोटाच्या स्नायूंना शांत करण्यास मदत करतात. यामुळे पचनसंस्था सुधारण्यासही मोठी मदत होते. प्रवासादरम्यान किंवा प्रवासाआधी या आल्याच्या गोळ्या खाल्ल्यास मोशन सिकनेसचा त्रास होत नाही. तुम्हाला प्रवासात त्रास जाणवू लागल्यास तुम्ही या गोळ्यांचे सेवन करु शकता. आल्याची गोळी तोंडात टाका आणि हळूहळू तिला चघळत राहा.
पुदिना तेल
पुदिन्याचा सुगंध मनाला शांत करुन जातो. यामुळे ताजेतवाने वाटू लागते. हे पोटातील पेटके कमी करण्यासही मदत करते. यामुळेच प्रवासावेळी आपल्यासोबत पुदिन्याचे तेल सोबत घेऊन जा. पेपरमिंट ऑईल म्हणजेच पुदिन्याचे तेल बाजारात सहज उपलब्ध होते. जेव्हाही प्रवासात उलटी, अस्वस्थता किंवा मळमळ होत असल्यासारखे वाटू लागेल तेव्हा हे तेल रुमालावर टाकून याचा सुगंध घेत राहा.
Travel News : एकट्याने फिरण्याचा विचार करताय? या चुका टाळल्या तर प्रवास होईल सुरक्षित
लिंबू आणि काळे मीठ
अस्वस्थता दूर करण्यासाठी लिंबू मोठा मदतनीस ठरु शकतो. लिंबू आणि काळे मीठ या समस्येला लवकर दूर करण्यास मदत करतात. यासाठी आपल्या सहलीदरम्यान किंवा प्रवासादरम्यान बॅगेत लिंबाची फोड आणि काळे मीठ घेऊन चाला. जेव्हा कधी तुम्हाला मोशन सिकनेसचा त्रास सतावू लागेल तेव्हा तुम्ही लिंबाच्या फोडीवर काळे मीठ लावून त्याचे सेवन करु शकता. ध्यानात ठेवा, तुम्हाला मोशन सिकनेसचा त्रास असल्यास नेहमी खिडकीच्या बाजूला बसणे प्रेफेर करा. शिवाय, एसी बंद करुन खिडकीतून येणाऱ्या मोकळ्या हवेची मजा लुटा.