Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Christmas 2025 : सणानिमित्त घरी बनवा टेस्टी सर्वांच्या आवडीचा ‘रेड वेल्व्हेट केक’, रेसिपी नोट करा

Red Velvet Cake Recipe : घरच्या घरी बनवलेला हा रेड व्हेल्वेट केक नक्कीच सर्वांना आवडेल आणि तुमच्या खास क्षणांना अधिक गोड बनवेल. ख्रिसमस सणानिमित्त तुम्ही घरीच हा केक तयार करून सणाचा गोडवा वाढवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 25, 2025 | 09:57 AM
Christmas 2025 : सणानिमित्त घरी बनवा टेस्टी सर्वांच्या आवडीचा 'रेड वेल्व्हेट केक', रेसिपी नोट करा

Christmas 2025 : सणानिमित्त घरी बनवा टेस्टी सर्वांच्या आवडीचा 'रेड वेल्व्हेट केक', रेसिपी नोट करा

Follow Us
Follow Us:
  • रेड वेल्व्हेट केक हा सर्वांच्या आवडीचा आहे.
  • चवीसोबत हा केक दिसायलाही फार आकर्षक दिसतो.
  • ख्रिसमस सणानिमित्त तुम्ही घरीच बेकरीसारखा रेड वेल्व्हेट केक तयार करू शकता.
रेड व्हेल्वेट केक हा केवळ दिसायला सुंदरच नाही तर त्याची चवही अतिशय मऊ, समृद्ध आणि खास असते. लालसर रंग, मऊ स्पॉंजी टेक्सचर आणि क्रीम चीज फ्रॉस्टिंग यामुळे हा केक आजकाल वाढदिवस, अ‍ॅनिव्हर्सरी, व्हॅलेंटाईन डे तसेच खास सेलिब्रेशनसाठी मोठ्या प्रमाणात बनवला जातो. रेड व्हेल्वेट केकचा उगम अमेरिकेत झाला असला तरी आज हा केक भारतातही प्रचंड लोकप्रिय झाला आहे. बेकरीमध्ये मिळणाऱ्या या केकची किंमत जास्त असते, पण योग्य पद्धत आणि मोजमाप वापरले तर हा केक अगदी घरच्या घरीही परफेक्ट बनवता येतो.

नाताळ सणाला ओव्हन आणि अंड्याचा वापर न करता झटपट बनवा स्वादिष्ट चॉकलेट केक, लहान मुलांसह मोठ्यांना आवडेल पदार्थ

या केकचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा अतिशय मऊ आणि ओलसर स्पंज. यामध्ये कोको पावडरचा हलका स्वाद, व्हॅनिलाचा सुगंध आणि बटरमिल्कमुळे मिळणारी सॉफ्टनेस यांचा सुंदर मेळ असतो. अनेकांना वाटते की रेड व्हेल्वेट केक बनवणे खूप अवघड आहे, पण प्रत्यक्षात योग्य स्टेप्स फॉलो केल्यास हा केक अगदी सोप्या पद्धतीने तयार होतो. आज आपण या रेसिपीत ओव्हनमध्ये बनणारा क्लासिक रेड व्हेल्वेट केक पाहणार आहोत, जो तुम्ही घरी सहज करू शकता.

साहित्य

केकसाठी:

  • मैदा – 1½ कप
  • साखर – 1 कप
  • कोको पावडर – 1 टेबलस्पून
  • बेकिंग सोडा – 1 टीस्पून
  • बेकिंग पावडर – ½ टीस्पून
  • मीठ – चिमूटभर
  • अंडी – 2
  • तेल – ¾ कप
  • बटरमिल्क – 1 कप
  • व्हॅनिला इसेन्स – 1 टीस्पून
  • रेड फूड कलर – 1 ते 2 टीस्पून
  • व्हिनेगर – 1 टीस्पून
फ्रॉस्टिंगसाठी:
  • क्रीम चीज – 200 ग्रॅम
  • बटर – ½ कप
  • पिठीसाखर – 1 कप
  • व्हॅनिला इसेन्स – ½ टीस्पून
31 डिसेंबरसाठी खास रेसिपी! चिकनचं लोणचं कधी तुम्ही खाल्लं आहे का? दक्षिण भारतातील हा झणझणीत पदार्थ एकदा चाखाच

कृती

  • यासाठी सर्वप्रथम ओव्हन 180°C वर प्रीहिट करा आणि केक टिनला बटर लावून मैदा भुरभुरा.
  • एका भांड्यात मैदा, कोको पावडर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि मीठ चाळून ठेवा.
  • दुसऱ्या भांड्यात अंडी आणि साखर चांगली फेटून घ्या. त्यात तेल, बटरमिल्क, व्हॅनिला इसेन्स आणि रेड फूड कलर घालून मिक्स करा.
  • आता कोरडे साहित्य थोड्या-थोड्या प्रमाणात ओल्या मिश्रणात घालून हलक्या हाताने मिसळा.
  • शेवटी व्हिनेगर घालून मिश्रण हलकेच ढवळा.
  • तयार मिश्रण केक टिनमध्ये ओता आणि ओव्हनमध्ये 30–35 मिनिटे बेक करा. टूथपिक घालून तपासा.
  • केक पूर्णपणे थंड झाल्यावर त्यावर क्रीम चीज फ्रॉस्टिंग लावा.
  • केक अधिक मऊ हवा असेल तर बटरमिल्क वापरणे खूप महत्त्वाचे आहे.
  • फूड कलर प्रमाणातच वापरा.
  • फ्रॉस्टिंग लावण्यापूर्वी केक पूर्ण थंड झालेला असावा.

Web Title: Christmas 2025 festival special make tasty red velvet cake at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 09:57 AM

Topics:  

  • Christmas
  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’
2

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
4

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.