नाताळ सणाला ओव्हन आणि अंड्याचा वापर न करता झटपट बनवा स्वादिष्ट चॉकलेट केक
दरवर्षी २५ डिसेंबरला मोठ्या आनंद आणि उत्साहात नाताळ सण साजरा केला जातो. या दिवशी घरात रोषणाई करून येशूची प्रार्थना केली जाते. याशिवाय अनेक गोड पदार्थ बनवले जातात. गोड पदार्थांमध्ये प्रामुख्याने केक हा पदार्थ बनवला जातो. वेगवेगळ्या फ्लेवर्सचा केक, बिस्कीट, कुकीज इत्यादी अनेक पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. केक हा पदार्थ घरातील कोणत्याही शुभ प्रसंगी विकत आणला जातो. कारण केक बनवण्यासाठी ओव्हन आणि इतर वेगवेगळ्या पदार्थांची आवश्यकता असते. घरी बनवलेला केक काहीवेळा व्यवस्थित बेक होत नाही तर कधी केक वरची क्रीम चांगली लागत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चॉकलेट केक बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. कमीत कमी साहित्यात बनवलेला चॉकलेट केक लहान मुलांसह मोठ्यांना खूप जास्त आवडेल. केक पाहून घरातील सगळेच तुमचे कौतुक करतील. नाताळ सणासाठी बनवलेला केक पाहून लहान मुलं खूप जास्त खुश होतील. चला तर जाणून घेऊया चॉकलेट केक बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)
Gobi Manchurian Recipe : फ्लॉवरचे कुरकुरीत मंचुरियन खाल्ले आहेत का? नोट करा रेसिपी






