Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्तवाहिन्यांना चिटकून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ पेयांचे सेवन, नसांमधील घाण होईल स्वच्छ

रक्तवाहिन्यांना चिटकून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात या पेयांचे नियमित सेवन करावे. यामुळे रक्तवाहिन्या आतून स्वच्छ होतील.

  • By सुरुची कदम
Updated On: May 20, 2025 | 05:30 AM
रक्तवाहिन्यांना चिटकून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा 'या' पेयांचे सेवन

रक्तवाहिन्यांना चिटकून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा 'या' पेयांचे सेवन

Follow Us
Follow Us:

दैनंदिन आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. चवीला गोड लागणारे पदार्थ बऱ्याचदा आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात. तेलकट किंवा तिखट पदार्थांचे आहारात भरपूर सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. शरीरात वाढलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल, दुसरे खराब कोलेस्ट्रॉल. चांगले कोलेस्ट्रॉल शरीरात निरोगी पेशी तयार करतात, तर खराब कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा करतात.(फोटो सौजन्य – iStock)

Rainbow Diet म्हणजे नेमकं काय? आहारात रंगीबेरंगी फळांचे सेवन केल्यास शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा झाल्यास रक्तवाहिन्यांसह हृदयाच्या आरोग्याला सुद्धा हानी पोहचते. हा चिकट थर रक्तवाहिन्या ब्लॉक करून टाकतो, ज्यामुळे शरीराला योग्य रक्तपुरवठा होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पेयांचे नियमित सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पेयांच्या सेवनामुळे शरीरातील पिवळ्या रंगाचा चिकट थर कमी होईल आणि हृद्य निरोगी राहील.

उच्च कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात दिसणारी लक्षणे:

  • छातीत दुखणे
  • पाय दुखणे
  • अंगावर पुरळ येणे
  • वाढलेला लठ्ठपणा
  • सतत घाम येणे
  • थोडा वेळ चालल्यानंतर लगेच थकवा येणे

डाळिंबाचा रस:

लाल रंगाचे बारीक दाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. या दाण्यांमध्ये असलेले गुणधर्म शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढतात. याशिवाय शरीरात साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात. डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणावर अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. त्यामुळे डाळिंबाचा रस तुम्ही सकाळी उठल्यानंतर किंवा इतर वेळी सुद्धा पिऊ शकता. यामुळे नसांमध्ये अडकलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी होईल.

गाजर बीटचा रस:

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी गाजर बीटच्या रसाचे सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेली सर्व घाण स्वच्छ होईल आणि शरीराला अनेक फायदे होतील. नसांमध्ये साचून राहिलेल्या खराब कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो. त्यामुळे नसांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी नियमित बीट गाजरच्या रसाचे सेवन करावे.

उन्हाळ्यात अननस खाल्यामुळे शरीराच्या ‘या’ अवयवांना मिळते भरपूर पोषण, हृद्य राहील कायम निरोगी

आवळ्याचा रस:

विटामिन सी युक्त आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले विटामिन सी आणि फायबर शरीरातील सर्व घाण स्वच्छ करते. खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होईल. यासोबतच शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Clean your arteries naturally drink these beverages to reduce sticky cholesterol and improve vascular health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • cholesterol symptoms
  • Healthy Drinks

संबंधित बातम्या

Cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढलाय? ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स ठरतील वरदान; आहारात करा समावेश
1

Cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढलाय? ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स ठरतील वरदान; आहारात करा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.