
कोलेस्टेरॉलवरील संशोधनाला मोठा धक्का! हृदयविकाराचा धोका कमी करणाऱ्या औषधाची चाचणी अपयशी
Health Update: शरीरातील विशिष्ट प्रकारचे कोलेस्टेरॉल कमी करून हृदयविकाराचा धोका घटवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. औषधनिर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी नोव्हार्टिसने विकसित केलेले ‘पेलाकार्सेन’ हे औषध हृदयविकाराचा धोका कमी करण्यात अपेक्षित यश मिळवू शकले नाही. तिसऱ्या टप्प्यातील महत्त्वपूर्ण चाचणीत औषधाचा प्रत्यक्ष वैद्यकीय फायदा सिद्ध न झाल्याने हृदयरोग संशोधन क्षेत्रात निराशा व्यक्त होत आहे.(फोटो सौजन्य – istock)
पेलाकार्सेन हे औषध लिपोप्रोटीन (अ) म्हणजेच एलपी (अ) या कोलेस्टेरॉलशी संबंधित घटकाचे प्रमाण कमी करण्यासाठी विकसित करण्यात आले होते. शरीरात या घटकाचे प्रमाण जास्त असल्यास हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हृदयाच्या झडपांचे विकार होण्याचा धोका वाढतो. विशेष म्हणजे, एलपी (अ) चे प्रमाण प्रामुख्याने आनुवंशिकतेवर अवलंबून असते. त्यामुळे नियमित व्यायाम, आहारातील बदल किंवा वजन कमी करूनही त्याचे प्रमाण सहज घटवता येत नाही. जगातील साधारण प्रत्येक पाचपैकी एका व्यक्तीमध्ये एलपी (अ) चे प्रमाण अधिक असल्याचे मानले जाते.
सामान्यतः वाईट कोलेस्टेरॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एलडीएलचे प्रमाण स्टॅटिनसारख्या औषधांनी कमी करता येते. मात्र, एलपी (अ) कमी करण्यासाठी अद्याप व्यापक मान्यता मिळालेले उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे पेलाकार्सेनकडे वैद्यकीय क्षेत्राचे विशेष लक्ष होते. या औषधामुळे एलपी (अ) चे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा अधिक कमी करता येत असल्याचे चाचण्यांमध्ये दिसून आले होते. मात्र, केवळ कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करणे आणि प्रत्यक्ष हृदयविकाराचा धोका कमी करणे या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचे या निष्कर्षातून पुन्हा स्पष्ट झाले आहे.
एकदा वापरलेलं तेल पुन्हा तळण्यासाठी वापरताय? शरीराला होऊ शकतात हे धोके!
दरम्यान, अॅमजेन आणि एली लिली या औषधनिर्मिती कंपन्याही एलपी (अ) कमी करणाऱ्या औषधांवर संशोधन करत आहेत. त्यांच्या चाचण्यांचे निष्कर्ष आता महत्त्वाचे ठरणार आहेत. आनुवंशिक संशोधनातून एलपी (अ) हा केवळ हृदयविकाराचा धोक्याचा संकेत नसून, आजाराला कारणीभूत ठरणारा घटक असू शकतो, असे सूचित झाले आहे. त्यामुळे या घटकाचे प्रमाण कमी केल्याने प्रत्यक्षात हृदयविकार आणि स्ट्रोकचे प्रमाण घटते का, याचे उत्तर मिळवणे हे वैद्यकीय संशोधनापुढील मोठे आव्हान ठरले आहे.
Ans: कोलेस्टेरॉल हा शरीरात आढळणारा मेणासारखा चरबीयुक्त पदार्थ आहे. शरीरातील पेशी आणि काही हार्मोन्स तयार करण्यासाठी त्याची आवश्यकता असते. मात्र, रक्तातील LDL म्हणजेच खराब कोलेस्टेरॉल वाढल्यास हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
Ans: रक्तातील LDL कोलेस्टेरॉल वाढल्यास रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतींवर चरबीचे थर जमा होऊ शकतात. त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊन हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.
Ans: कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी डॉक्टर रुग्णाच्या आरोग्यस्थितीनुसार स्टॅटिन्स, एझेटिमाइब आणि PCSK9 इनहिबिटर्स यांसारखी औषधे देऊ शकतात. कोणते औषध योग्य आहे, हे डॉक्टर ठरवतात.