आहारात रंगीबेरंगी फळांचे सेवन केल्यास शरीराला होतील 'हे' आश्चर्यकारक फायदे
कायम निरोगी राहण्यासाठी अनेक लोक डाएट करतात. याशिवाय वाढलेले वजन कमी करताना सुद्धा डाएट केला जातो. डाएट केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी महिलांसह पुरुषसुद्धा डाएट करतात. आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. कमी तिखट, कमी तेलकट तर काही लोक मीठ नसलेले अळणी पदार्थ खाऊन वाढलेले वजन कमी करतात. योग्य आहार फॉलो केल्यास वाढलेले वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. शरीरावर वाढलेल्या चरबीमुळे महिलांचा आत्मविश्वास काहीसा कमी होऊन जातो. त्यामुळे शरीर कायम स्लिम आणि हेल्दी राहण्यासाठी रेनबो डाएट केला जातो. आज आम्ही तुम्हाला रेनबो डाएट म्हणजे काय? रेनबो डाएट केल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
रेनबो डाएट म्हणजे वजन कमी करण्यासाठी किंवा कायम निरोगी राहण्यासाठी आहारात वेगवेगळ्या रंगीत भाज्या आणि फळांचे सेवन करणे. या डाएटला रेनबो डाएट असे म्हंटले जाते. हा डाएट आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानला जातो. आहारात वेगवेगळ्या भाज्यांचे किंवा फळांचे सेवन केल्यामुळे शरीराला वेगवेगळे फायटोन्यूट्रिएंट्स मिळतात. याशिवाय रोगांपासून शरीराचे नुकसान होत नाही.
रेनबो डाएट केल्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. आहारात वेगवेगळ्या फळांचे आणि भाज्यांचे सेवन केल्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होते. रेनबो डाएटमध्ये विटामिन ए आणि विटामिन सी समृद्ध असलेले पदार्थ खाल्यामुळे शरीरातील पोषक घटकांची कमतरता दूर होते आणि त्वचा सुंदर दिसू लागते. याशिवाय त्वचेच्या आतमधील मृत पेशी नष्ट होऊन चेहरा उजळदार दिसतो. रेनबो डाएट केल्यामुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी होऊन त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.
बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीमुळे किंवा कामाच्या तणावामुळे शरीराकडे व्यवस्थित लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. अशावेळी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आहारात फळे, भाज्या आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रेनबो डाएट प्रभावी ठरेल.
उन्हाळ्यात अननस खाल्यामुळे शरीराच्या ‘या’ अवयवांना मिळते भरपूर पोषण, हृद्य राहील कायम निरोगी
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र तरीसुद्धा वाढलेले वजन कमी होत नाही. अशावेळी रेनबो डाएट करावा. आहारात फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे युक्त पदार्थांचे भरपूर सेवन करावे. पौष्टिक आहार घेतल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. शरीरात वाढलेला अशक्तपणा, थकवा दूर करण्यासाठी रेनबो डाएट प्रभावी ठरेल.