कोलेस्ट्रॉलने भरलेल्या नसा होतील कायमच्या होतील स्वच्छ!
दैनंदिन आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते. शरीरात कोलेस्टरॉलसोबतच मधुमेह आणि इतर आजारांची सुद्धा वाढ होते. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळून येते. चांगले कोलेस्ट्रॉल आणि खराब कोलेस्ट्रॉल. शरीरासाठी चांगले कोलेस्ट्रॉल अतिशय महत्वाचे असते. पण वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्यांना इजा पोहचण्याची शक्यता असते. खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा होऊ लागतो. हा चिकट थर जमा झाल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. ज्यामुळे हार्ट अटॅक किंवा हृद्यासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. नसांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल संपूर्ण शरीराला हानी पोहचवते.(फोटो सौजन्य – istock)
किडनी खराब होण्याच्या ‘या’ सुरुवातीच्या लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष; ताबडतोब गाठा हॉस्पिटल
शरीरात वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांसोबतच संपूर्ण शरीराच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. ज्यामुळे मेंदूला योग्य प्रमाणात रक्त पोहचत नाही. शरीरात ऑक्सिजन पुरवठा योग्य न झाल्यामुळे बऱ्याचदा हार्ट अटॅक येण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या फळांचे सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी होते.
शरीरासाठी आंबट फळे अतिशय प्रभावी आहेत. रोजच्या आहारात लिंबू, संत्री, मोसंबी आणि द्राक्ष किंवा इतर आंबट फळांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. या फळांमध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे ठरतात. विटामिन सी युक्त फळांचे सेवन केल्यामुळे नसांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल बाहेर पडून जाते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.
‘रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरकडे जाणे विसरा’ असे अनेकदा बोलले जाते. सकाळच्या नाश्त्यात नियमित रोज एक सफरचंद खाल्ल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. यासोबतच कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. सफरचंदामध्ये पेक्टिन नावाचे फायबर आढळून येते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये साचलेले खराब कोलेस्ट्रॉल बाहेर पडून जाण्यास मदत होते.
आरोग्यासाठी अॅवोकाडो अतिशय गुणकारी आहे. अॅवोकाडोचा वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. अॅवोकाडो सँडविच, अॅवोकाडो सॅलड किंवा इतरही अनेक पदार्थ बनवले जातात. यामध्ये ऑलिव अॅसिड भरपूर आढळून येते, ज्यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ होतात. फायबरने समृद्ध असलेले अॅवोकाडो खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे होतात.
कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?
कोलेस्ट्रॉल शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणारे एक मेद (fat) आहे, जे पेशी आणि काही हार्मोन्स बनवण्यासाठी आवश्यक असते.
कोलेस्ट्रॉलची पातळी कशी तपासायची?
कोलेस्ट्रॉलची पातळी तपासण्यासाठी रक्ताची तपासणी करणे आवश्यक आहे. तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी किती वेळ लागतो?
जीवनशैलीत बदल केल्यास काही आठवड्यांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते, पण काही लोकांसाठी यात जास्त वेळ लागू शकतो, काही महिने किंवा त्याहून जास्त.