उपवासाच्या दिवसांमध्ये शरीरात सतत थकवा जाणवतो? मग ऊर्जा वाढवण्यासाठी 'या' ड्रिंक्सचे करा सेवन
सणावाराच्या दिवसांमध्ये महिलांसह पुरुष सुद्धा उपवास करतात. उपवासाच्या दिवशी शरीरातील ऊर्जा आणि आरोग्य कायम निरोगी राहणे आवश्यक आहे. उपवास केल्यानंतर अनेक लोक दिवसभर फक्त पाण्याचे सेवन करतात. जास्त वेळ उपाशी राहिल्यामुळे अशक्तपणा, थकवा आणि डिहायड्रेशनची समस्या उद्भवू लागते. शरीरात वाढलेला अशक्तपणा कमी करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे लागतात. त्यामुळे उपवासाच्या दिवशी शरीर निरोगी ठेवण्यासाठी फळे आणि हेल्दी ड्रिंकचे सेवन करावे. उपवास केल्यानंतर आहारात वेगवेगळ्या पेयांचे सेवन करावे. या पेयांच्या सेवनामुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहते, शरीरातील घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला उपवासाच्या दिवशी शरीरातील ऊर्जा कायम टिकवून राहण्यासाठी कोणत्या हेल्दी ड्रिंकचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या ड्रिंकच्या सेवनामुळे पोटात साचून राहिलेली विषारी घाण बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधारेल.(फोटो सौजन्य – istock)
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीर हायड्रेट आणि फ्रेश ठेवण्यासाठी ताक प्यायले जाते. ताक प्यायल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते. उपवासाच्या दिवशी साबुदाणे किंवा भगर खाल्यास दही, ताकाचे सेवन करावे. यामुळे खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होतात. ताक बनवताना त्यात पाणी, काळे मीठ आणि जिऱ्याची पावडर मिक्स करून प्यावे. यामुळे पचनाची कोणतेही समस्या उद्भवत नाही. वारंवार होणाऱ्या ऍसिडिटीपासून सुटका मिळवण्यासाठी ताक प्यावे.
नारळ पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते. यामध्ये असलेले घटक शरीर कायमच हायड्रेट ठेवतात.याशिवाय शरीरात अशक्तपणा, थकवा किंवा डिहायड्रेशनची समस्या उद्भवल्यास नारळ पाण्याचे सेवन करावे. नारळ पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स, पोटॅशियम आणि खनिजे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे शरीरात तात्काळ ऊर्जा मिळते. नारळ पाण्याचे आठवड्यातून दोनदा सेवन केल्यास त्वचेवर चमकदार ग्लो येतो आणि शरीर कायमच हायड्रेट राहते.
Navratri Fast: नवरात्रीच्या उपवासात या चुका करणे टाळा! अन्यथा आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
विटामिन सी युक्त लिंबाच्या रसाचे नियमित सेवन केल्यास शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता दूर होईल. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. वाढलेले वजन कमी करताना लिंबाचा रस प्यावा. लिंबाच्या रसात असलेल्या घटकांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कायमच निरोगी राहते.
उपवासाचे मुख्य फायदे:
उपवास केल्याने शरीरातील चरबी कमी होते, ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवता येते. उपवास रक्तातील साखरेचे प्रमाण सुधारण्यास मदत करते. यामुळे मेंदूचे कार्य सुधारते आणि अल्झायमरसारख्या आजारांपासून बचाव होतो.
उपवास करण्यापूर्वी आवश्यक गोष्टी:
कोणताही उपवास सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे, विशेषतः जर तुम्हाला काही वैद्यकीय समस्या असतील.