कार्यक्रमात वाजणारा मोठा आवाजातील डीजे आरोग्यासाठी ठरेल जीवघेणा
सण उत्सवाच्या कालावधीमध्ये सगळीकडे मोठ्या आवाजात गाणी लावली जातात. पण लाऊड स्पीकर, डीजे इत्यादी उपकरण लावली जातात. पण मोठ्या आवाजात लावल्या जाणाऱ्या गाण्यांमुळे आरोग्यालाहानी पोहचते. डीजेचा मोठा आवाज शरीरासाठी जीवघेणा ठरू शकतो. घराच्या आजूबाजूला किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी डीजे लावले जातात. डीजेच्या मोठ्या आवाजाने घरातील लहान मुलांची आणि वडीलधाऱ्यांची तब्येत लगेच बिघडून जाते. याशिवाय काहीवेळा डीजेच्या मोठ्या आवाजामुळे हार्ट अटॅक किंवा ब्रेन हॅमरेज इत्यादी गंभीर समस्या उद्भवतात. त्यामुळे मोठ्या डीजेच्या आवाजात बाहेर फिरण्यास जाऊ नये. आत्तापर्यंत अनेक लोकांचा डीजेच्या मोठ्या आवाजाने जीव देखील गेला आहे. तरीसुद्धा सणासुदीच्या दिवसांमध्ये मोठ्या आवाजात डीजे लावून गाणी लावली जातात.(फोटो सौजन्य – istock)
Navratri Fast: नवरात्रीच्या उपवासात या चुका करणे टाळा! अन्यथा आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
मोठ्या आवाजात डीजेवर गाणी लावल्यामुळे किंवा डीजेच्या जास्त डेसिबल असलेल्या म्युझिकच्या सानिध्यात राहिल्यामुळे केवळ कानाला नाहीतर संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. मोठ्या आवाजामुळे कानासोबतच हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम होतात.डीजेचा मोठा आवाज अचानक कानापर्यंत पोहचतो त्यावेळी शरीर स्ट्रेस रिस्पॉन्स एक्टिव्हेट होते. अशावेळी शरीर धोक्याचे संकेत देते. एड्रेनालिन हार्मोन रिलीज झाल्यामुळे हृदयाचे ठोके अतिशय जलद होतात. ज्यामुळे काहीवेळा उच्च रक्तदाब वाढतो आणि मेंदू, हृदयाच्या रक्तवाहिन्यांना हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते.
जास्त वेळ डीजेच्या मोठ्या आवाजात उभे राहिल्यामुळे हृदयाचे आरोग्य बिघडते. ८५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजात उभे राहिल्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांना हानी पोहचते. हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक हिस्ट्री किंवा मधुमेहाच्या रुग्णांनी डीजेच्या आवाजात जाणे टाळावे. अन्यथा आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात. मोठ्या आवाजामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि हृदयाच्या नसांवर तणाव येतो. याशिवाय काहीवेळा हार्ट अटॅक आल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्या फुटण्याची शक्यता असते.
हाय डेसिबल डीजेच्या आवाजात जास्त वेळ उभे राहिल्यामुळे हृदयासोबतच मेंदूच्या नसांना सुद्धा हानी पोहचते. उच्च रक्तदाब वाढल्यामुळे मेंदूच्या रक्तवाहिन्या फुटतात. याशिवाय डीजेच्या सानिध्यात जास्त वेळ राहिल्या ब्रेन हॅमरेज होण्याची शक्यता असते. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये कमीत कमी आवाजामध्ये डीजे किंवा स्पीकरवर गाणी लावावी.
डीजेचा आवाज किती असावा?
ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी डीजेचा आवाज सरकारने निश्चित केलेल्या डेसिबल मर्यादेत असणे आवश्यक आहे. साधारणपणे, तो ६५ डेसिबलपेक्षा जास्त नसावा, परंतु काही अटी लागू होऊ शकतात.
डीजे साउंडचे दुष्परिणाम काय आहेत?
सर्वात महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे तुमच्या श्रवणशक्तीला होणारे नुकसान, जे अपरिवर्तनीय असू शकते. मोठ्या आवाजाच्या संपर्कात आल्याने कानात टिनिटस होऊ शकतो, जो सतत वाजत राहतो किंवा गुंजत राहतो.
तुम्ही स्वतःचे रक्षण कसे करू शकता?
तुमच्या कानापर्यंत पोहोचणाऱ्या आवाजाची तीव्रता कमी करण्यासाठी इअरप्लग किंवा आवाज कमी करणारे हेडफोन घाला. तुमच्या कानांना बरे होण्याची संधी देण्यासाठी काही काळ मोठ्या आवाजातील संगीतापासून दूर राहा.