घामाच्या दुर्गंधीमुळे अंगाला सतत खाज येते? 'हे' घरगुती उपाय करून मिळवा आराम
शरीरातील विषारी घटक लघवीवाटे, घामावाटे बाहेर पडून जातात. यामुळे बऱ्याचदा काहींच्या शरीराला खूप जास्त दुर्गंधीचा वास येतो. तर काहींना खूप घाम येतो. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाणे आवश्यक आहे. अन्यथा आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.उन्हाळ्यासह वर्षाच्या बाराही महिने अंगाला घाम येतो. पण घामाची दुर्गंधी येत नाही. त्वचेवरील विषाणू घामामध्ये मिक्स झाल्यानंतर शरीराला घाणेरडा वास येऊ लागतो, ज्यामुळे काहींना अंगाला खाज येणे, अंगावर लाल रॅश उठण्याची जास्त शक्यता असते. यामागे अनेक वेगवेगळी कारणे आहेत. आहारात सतत होणारे बदल, अस्वच्छता, ताणतणाव, हार्मोन्सचे बदल तर काहीवेळा वारंवार गोळ्या औषधांचे सेवन केल्यामुळे अंगाला घामाच्या दुर्गंधीचा घाणेरडा वास येतो.(फोटो सौजन्य – istock)
आहारात मसालेदार, जास्त तेलकट किंवा कांदा-लसूण इत्यादी पदार्थांचे जास्त सेवन केल्यामुळे शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात. याशिवाय वारंवार घाम आल्यामुळे त्वचा अधिक ओली राहते. ज्यामुळे शरीरावर बुरशीजन्य पदार्थ वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला घामाच्या दुर्गंधीपासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यामुळे घामाचा वास कमी होईल आणि शरीर स्वच्छ राहील.
बेकिंग सोडा जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तसेच त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. वाटीमध्ये बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिक्स करून घ्या. तयार केलेला लेप काखेत लावल्यास घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळेल. याशिवाय काखेत वाढलेले जिवाणू नष्ट होतील. पण लिंबाच्या रसामुळे काहींच्या त्वचेवर जळजळ वाढते. तसेच संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींनी लिंबाच्या रसाचा वापर करू नये.
पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत कडुलिंबाचा वापर आरोग्यासंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जात आहे. कडुलिंबामध्ये असलेले औषधी गुणधर्म शरीर आतून स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. कडुलिंबाच्या पानांचा लेप बनवण्यासाठी वाटीमध्ये कडुलिंब पावडर घेऊन त्यात पाणी मिक्स करा. तयार केलेला लेप काखेत लावून काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका. यामुळे घामाची दुर्गंधी कमी होईल.
सर्वच घरांमध्ये खोबरेल तेलाची बॉटल असते. त्यामुळे काखेत वाढलेली दुर्गंधी कमी करण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करावा. खोबरेल तेल काखेत लावल्यामुळे घामाची दुर्गंधी कमी होईल. याशिवाय त्वचा रोग बरे करण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करावा.