चेहऱ्यावर येईल डायमंड फेशियलचा ग्लो! 'या' पद्धतीने चेहऱ्यावर लावा कच्चे दूध
नवरात्री उत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सणावाराच्या दिवसांमधे चेहरा अधिक सुंदर आणि चमकदार करण्यासाठी महिला- मुली बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट करतात, ज्यामुळे चेहऱ्यावर चमकदार ग्लो येतो. पण हा ग्लो काही दिवसच चेहऱ्यावर टिकून राहतो. मात्र पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते. कायमच वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. पण त्वचेच्या प्रकारानुसार स्किन केअर प्रॉडक्ट न वापरल्यामुळे चेहरा निस्तेज होऊन जातो. कधी कधी चेहरा खूप जास्त काळवंडलेला वाटू लागतो. चेहऱ्यावर जमा झालेल्या डेड स्किनमुळे त्वचेला हानी पोहचते. डेड स्किन कमी करण्यासाठी वेगवेगळे फेशिअल किंवा क्लीनअप करून घेतले जातात, पण तरीसुद्धा कोणताच फरक चेहऱ्यावर लगेच दिसून येत नाही.(फोटो सौजन्य – istock)
त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या क्रीम, ट्रीटमेंट किंवा फेशिअल करून घेण्यापेक्षा घरगुती पदार्थांचा वापर त्वचेसाठी करावा. यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक कायम टिकून राहते. स्किन हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे चेहऱ्यावर लगेच परिणाम दिसून येतात. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर कच्च्या दुधाचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
मिल्क फेशियल करण्यासाठी सर्वप्रथम, त्वचा स्वच्छ करून घ्यावी. यासाठी थंड दूध कापसाच्या गोळ्यांमध्ये घेऊन संपूर्ण त्वचेवर लावून घ्या. यामुळे त्वचेमध्ये जमा झालेली घाण, धूळ, माती निघून जाईल आणि चेहरा स्वच्छ करून घ्या. फेशिअल करताना चेहरा क्लिंझिंग करणे अतिशय महत्वाचे आहे. यामुळे त्वचा स्वच्छ होते.
स्क्रब तयार करण्यासाठी वाटीमध्ये तांदळाचे पीठ घेऊन त्यात कच्चे दूध मिक्स करा. तयार केलेला स्क्रब संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेली घाण, डेडस्किन, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स निघून जातील. स्क्रब लावण्यानंतर त्वचेवर २ ते ३ मिनिटांपर्यंत मसाज करून घ्यावा. त्यानंतर काहीवेळ थांबून त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
वाटीमध्ये कच्चे दूध घेऊन त्यात कोरफड जेल मिक्स करा. तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर हाताने मसाज करा. ५ मिनिटं झाल्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करून घ्या.
सगळ्यात शेवटी फेसपॅक तयार करून चेहऱ्यावर लावा. यासाठी वाटीमध्ये मिल्क पावडर आणि बेसन पीठ घ्या. त्यानंतर त्यात हळद टाकून व्यवस्थित मिक्स करा. कच्चे दूध टाकून घट्टसर मिश्रण करून चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून घ्या. घरगुती फेशिअल केल्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक वाढेल.