पोट- मांड्यांवर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी 'या' पद्धतीने करा मेथी दाण्यांचे सेवन
जगभरात वाढलेल्या वजनाने सर्वच लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर शरीरावर अनावश्यक चरबी जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवतात. पोट आणि मांड्यांवर वाढलेल्या चरबीच्या घेरमुळे काहीवेळा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, मानसिक ताण, जंक फूडचे सेवन, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे वजन वाढणे, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब इत्यादी गंभीर आजारांची शरीराला लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरावर अनावश्यक चरबी कमी करणे आवश्यक आहे. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे पोट आणि मांड्यांवर चरबीचा थर जमा होण्यास सुरुवात होते.(फोटो सौजन्य – istock)
शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा ‘ही’ सवय, गंभीर आजारांपासून होईल शरीराचे रक्षण
वाढलेल्या वजनामुळे शरीराचा आकार विचत्र दिसू लागतो. वजन कमी करण्यासाठी आहारात बदल करून डाएट फॉलो केला जातो. याशिवाय काही लोक तासनतास जिममध्ये जाऊन व्यायाम करतात. पण यामुळे शरीराला फायदे होण्याऐवजी तोटेच होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करताना आहारात मेथी दाण्यांचे सेवन कशा पद्धतीने करावे? मेथी दाण्यांचे शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.महिनाभर नियमित मेथी दाण्यांचे सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील आणि वजन कमी होईल.
मेथी दाण्यांमध्ये भरपूर फायबर आढळून येते. दैनंदिन आहारात फायबर युक्त पदार्थांचे सेवन केल्यास शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी आणि चांगली राहील. याशिवाय मेथी दाण्यांमध्ये असलेल्या घटकांमुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. रात्र झोपण्याआधी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा मेथी दाणे भिजत ठेवा. मेथी दाणे रात्रभर भिजल्यानंतर सकाळी उठून उपाशी पोटी मेथी दाण्यांच्या पाण्याचे सेवन करावे. या पाण्याच्या सेवनामुळे पोटात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर डिटॉक्स होईल. सर्वच स्वयंपाक घरात मेथी दाणे कायमच उपलब्ध असतात.
शरीरात वाढलेली ऍसिडिटी, अपचन किंवा गॅसच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी मेथी दाण्यांचे सेवन करावे. चवीला कडू असणारे मेथी दाणे केवळ आरोग्यासाठीच नाहीतर त्वचा आणि केसांसाठी गुणकारी ठरतात. अपचनाची समस्या उद्भवल्यानंतर वारंवार गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी मेथी दाण्यांचे सेवन करावे. यामुळे शरीर कायमच हेल्दी राहील. यामध्ये असलेले फायबर ब्लड शुगर कंट्रोल करतात. मेथी दाणे खाल्यामुळे मेटाबॉलिझ्म वाढण्यास मदत होते.
कफ सिरप की विष! Cough syrup प्यायल्याने ११ निष्पाप मुलांचा मृत्यू, दोन सिरपवर तात्पुरती बंदी
वजन कमी करताना मेथी दाण्यांच्या पाण्याचे सेवन केल्यास दाण्यांमध्ये असलेले तंतुमय पदार्थ शरीर शोषून घेते, ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि लवकर भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी करताना मेथी दाण्यांचे सेवन करावे. मेथी दाणे केवळ वजन कमी करण्यासाठी नाहीतर हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा गुणकारी ठरतात. शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मेथी दाण्यांच्या पाण्याचे नियमित सेवन करावे. यामुळे केस आणि त्वचेचे सौंदर्य खुलून दिसते.