बाबा रामदेवांचा जबरदस्त घरगुती उपाय, वजन होईल झर्रकन कमी (फोटो सौजन्य - iStock/Instagram)
जगातील प्रत्येक देश लठ्ठपणाने त्रस्त आहे. लोकसंख्येचा एक मोठा भाग लठ्ठपणा या आजाराचा बळी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, दर ८ पैकी एक व्यक्ती लठ्ठपणाचा बळी पडतोय. काही लोकांचे वजन इतके वाढते की ते कमी करणे अशक्य वाटते. पण बाबा रामदेव यांनी अशी पद्धत सांगितली आहे, ज्याद्वारे सर्वात जाड लोकही बारीक होऊ शकतात.
वजन कसे कमी करावे? योगगुरू रामदेव यांनी राजस्थानमधील बिरबल या मुलाचे उदाहरण दिले आणि वजन कमी करण्याचा नैसर्गिक मार्ग सांगितला. त्यांनी सांगितले की राजस्थानमध्ये दाल बाटी चुरमा खूप खाल्ला जातो. दूध, दही, तूप, जलेबी, लाडू खाल्ल्याने बिरबलचे वजन वाढले. बिरबलचे पोट खूप मोठे होते आणि त्याचे वजन 152 किलो होते. पण बाबा रामदेव यांच्या टिप्स आणि योगासनांमुळे त्याचे 4 किलो वजन कमी झाले. बाबा रामदेव यांनी काही सोप्या पद्धती सांगितल्या असून 5 पदार्थ खाणे टाळण्यास सांगितले आहे, जाणून घ्या अधिक माहिती (फोटो सौजन्य – iStock/Instagram)
लठ्ठपणामुळे होतात आजार
वजन वाढल्याने अनेक आजारांना मिळतं निमंत्रण
वजन वाढल्याने शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. रामदेव बाबा सोशल मीडियावर सक्रिय असून त्यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओत सांगितले की, लठ्ठपणामुळे रक्तदाब वाढतो, रक्तातील साखर वाढते, हृदयाच्या समस्या निर्माण होतात, कंबर आणि गुडघ्यांवर दबाव येतो, ज्यामुळे वेदना होतात. परंतु आसन आणि प्राणायामने नैसर्गिकरित्या वजन कमी करता येते.
काय सांगता? केवळ पाणी पिऊन होऊ शकते 10 किलो वजन कमी, 15 दिवसात दिसेल परिणाम
एका दिवसात १ किलो
वजन कसे कराल कमी
योगगुरू म्हणाले की, जर योग्य पद्धत अवलंबली तर एका दिवसात एक किलो वजन कमी करता येते. योग, आयुर्वेद आणि आहारातील बदल हे वजन कमी करण्याच्या वैज्ञानिक पद्धती आहेत. यासाठी त्यांनी व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या आणि अधिक वजन असणाऱ्या बिरबला कोणत्या ५ गोष्टी सोडण्यास सांगितल्या ते जाणून घेऊया.
5 पदार्थ करा बंद
कोणत्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे
बाबा रामदेव यांनी बिरबलला सांगितले की, नियमित योगासन आणि प्राणायाम करणे वजन कमी करण्यासाठी आवश्यक आहे. आणि याशिवाय काही दिवस धान्य, मीठ, मिठाई, दूध, तूप हे पाच पदार्थ तुम्ही जेवणातून खाणे बंद करा. यामुळे वजन कमी होईल आणि शरीर सडपातळ होऊ लागेल. तुमचे वजन कमी होऊ लागल्यानंतर तुमचा स्वतःच्या जिभेवर ताबा राहणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही धान्याची चपाती, तूप, दूध, गोड पदार्थ आणि मीठ यांचे सेवन करणे तुम्ही सोडून द्यावे. मीठ वरून पेरून खाऊ नये. तर गोड पदार्थांपासून दोन हात लांब राहणेच तुमचे वजन कमी करण्यास हातभार लाऊ शकते.
जेव्हा तुम्ही या गोष्टी खाणे बंद करता तेव्हा शरीराला खूप कमी कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स मिळतात. त्यामुळे आधीच असलेल्या चरबीचा वापर करून ऊर्जा निर्माण करावी लागेल. शरीरावर जमा होणारी अतिरिक्त चरबी ताकद निर्माण करेल आणि वजन कमी होईल.
थुलथुलीत पोट आणि लटकलेली चरबी कमी करून करा वेट लॉस, जपानी ट्रिक्स वापरून बघा जादू!
वजन कमी करण्यासाठी काय खावे?
कोणते पदार्थ खाणे ठरेल फायदेशीर
याच व्हिडिओत बाबा रामदेव यांनी बिरबलला या 5 गोष्टींऐवजी काय खावे हेदेखील सांगितले. बाबा रामदेव यांनी सांगितले की आहारात सॅलड, खरबूज, टरबूज आणि उकडलेल्या भाज्या खा. यामुळे शरीरात पाणी, जीवनसत्त्वे, प्रथिने यासारख्या आवश्यक पोषक तत्वांची कमतरता भासणार नाही. उकडलेल्या भाज्यांचे सेवन करणे हे वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. कारण यातून आवश्यक प्रोटीन, विटामिन्स शरीराला मिळतात आणि अधिक कॅलरीज पोटात जात नाहीत.
बाबा रामदेव यांचा सल्ला