विटामिन डी युक्त पदार्थ
शरीर निरोगी राहण्यासाठी शरीराला विटामिनची आवशक्यता असते. शरीरात विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीराला विटामिन डी फार गरजेचे आहे. पण या विटामिनची शरीरात कमतरता निर्माण झाल्यानंतर अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आहारात पौष्टिक आणि पचनास हलक्या असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन, अपुरी झोप, मानसिक तणाव इत्यादी गोष्टींमुळे आरोग्य बिघडून जाते. बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी महिला अनेक प्रयत्न करत असतात. शरीरामध्ये विटामिन डी ची कमतरता निर्माण झाल्यानंतर प्रोटीनसाठी सप्लिमेंट्स घ्यावे लागते. पण हे सप्लिमेंट्स घेण्याऐवजी तुम्ही आहारात पौष्टिक आणि विटामिन डी युक्त पदार्थांचे सेवन करू शकता. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत हे पदार्थ.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, मेंदूचे कार्य वाढून बुद्धी राहील तीक्ष्ण
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेक लोक पालक खाण्यास नकार देतात. पण पालक भाजीमध्ये मोठ्या प्रमाणावर विटामिन डी आढळून येते. शरीरात कमी झालेली विटामिन डी ची पातळी वाढण्यासाठी आहारात पालकचे सेवन करावे. पालकपासून तुम्ही भाजी, स्मूदी किंवा इतर पदार्थ सुद्धा बनवू शकता. या भाजीमध्ये विविध अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर आढळून येतात.
प्रोटीनयुक्त ब्रोकोली खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. रोजच्या आहारात तुम्ही ब्रोकोलीचे सेवन करू शकता. १०० ग्रॅम ब्रोकोलीमध्ये २.८ ग्रॅम प्रोटीन आणि विटामिन डी आढळून येते. शिवाय ब्रोकोली खाल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. शरीरातील इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि आरोग्य निरोगी राहण्यासाठी ब्रोकोली गुणकारी आहे.
रोजच्या आहारात कडधान्यांचा समावेश करावा. १०० ग्रॅम स्प्राउट्समध्ये सुमारे ४ ग्रॅम प्रोटीन आढळून येते. कडधान्य खाल्यामुळे डायजेस्टिव सिस्टम सुधारण्यास मदत होते आणि शरीरात इतर विटामिनची पातळी वाढते. कडधान्यांपासून तुम्ही भाजी, सॅलड, चिला किंवा इतर कोणतेही पदार्थ बनवून खाऊ शकता.
मुळा भाजीचा वास अनेकांना आवडत नाही. पण या भाजीमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि विटामिन डी आढळून येते. या भाजीच्या पानांमध्ये असलेले गुणधर्म त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. त्यामुळे आहारात मुळा खावा. या भाजीपासून मुळा चटणी, पराठा किंवा सॅलड इत्यादी अनेक पदार्थ बनवता येतात. पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या भाजीचे सेवन केल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
हे देखील वाचा: Vaginitis म्हणजे काय? असुरक्षित लैंगिक संबंध ठरू शकतात व्हजायनल इरिटेशनचे कारण, वाचा सविस्तर
बाजारात सर्वच ऋतूंमध्ये मशरूम उपलब्ध असतात. मशरूम भाजीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे तुम्हीसुद्धा रोजच्या आहारात मशरूमचा समावेश केल्यास विटामिन डी ची कमतरता दूर होईल. १०० ग्रॅम मशरूममध्ये ३.१ ग्रॅम प्रोटीन असते. यामुळे हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी आहारात वेगवेगळ्या भाज्यांचे सेवन करावे.