मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पोषण आहार घेणे आवश्यक आहे. आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यास मेंदूचे कार्य योग्य पद्धतीने काम करते. शिवाय शारीरिक विकासामध्ये अडथळा येत नाही. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी फॉलो केल्यामुळे कमी वयातच स्मरणशक्ती कमकुवत होण्यास सुरुवात होते. त्यामुळे मेंदूचे कार्य सुरळीत चालू राहण्यासाठी आहारात ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स, अँटीऑक्सिडंट्स. आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स युक्त पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला मेंदूच्या निरोगी आरोग्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया (फोटो सौजन्य-istock)
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
पालेभाज्यांमध्ये पालक ही भाजी प्रामुख्याने खाल्ली जाते. पालकमध्ये फोलेट, आयर्न आणि विटामिन के इत्यादी अनेक घटक आढळून येतात.
फायबर युक्त बदाम मेंदूसाठी अतिशय पौष्टिक मानले जातात. नियमित ३ ते ४ बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. विटामिन ई, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळून येतात.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच ब्लूबेरी खूप आवडतात. मेंदूच्या निरोगी आरोग्यासाठी ब्लूबेरी अतिशय फायदेशीर आहेत. यामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात.
स्मरणशक्ती मजबूत करण्यासाठी आहारात सॅल्मन माशाचे सेवन करावे. हा मासा मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतो. अल्झायमरसारख्या गंभीर आजारापासून शरीराचा बचाव करण्यासाठी सॅल्मन मासा अतिशय प्रभावी आहे.
ओमेगा-३ फॅटी ॲसिड युक्त अक्रोड खाल्यामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते. मेंदूचा विकास होण्यास सुरुवात होते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित २ अक्रोडाचे सेवन करावे, ज्यामुळे मेंदूच्या कार्यात अडथळा निर्माण होणार नाही.