Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडक उन्हामुळे वारंवार आजारी पडताय? शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन

शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पालेभाज्या, फळे किंवा थंड पदार्थांचे नियमित सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला अनेक गुणकारी फायदे होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: May 08, 2025 | 09:47 AM
शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन

शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. कधी कडक ऊन तर कधी अचानक पडत असलेल्या पाऊसामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. या दिवसांमध्ये आजारपण वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. कडक उन्हाळ्यात अंगातून सतत घामाच्या धारा वाहू लागतात. घामाच्या धारा वाहू लागल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. कारण शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता शरीरासाठी अतिशय घातक आहे. यामुळे डिहायड्रेशन किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)

आयुष्यात दिसून येतील सकारात्मक बदल! दिवसाची सुरुवात करा ‘या’ आयुर्वेदिक नियमांप्रमाणे, शंभर वर्षांपेक्षा जास्त जगाल आयुष्य

उन्हाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे पदार्थ खावेत:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ताक किंवा दह्यापासून बनवलेले पदार्थ खाण्यावर जास्त भर द्यावा. कारण उन्हाळ्यात शरीरात वाढलेली उष्णता नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे पोटात वारंवार आग होणे, उलट्या किंवा जुलाब होण्याची शक्यता असते. त्यामुळे या दिवसांमध्ये थंड पदार्थांचे सेवन करावे. नियमित एक ग्लास ताक प्यायल्यामुळे शरीरात थंडावा कायम टिकून राहतो. याशिवाय शरीरात ऊर्जेची कमतरता जाणवत नाही. दह्यापासून तुम्ही ताक, दही, लस्सी किंवा इतरही पदार्थ बनवून खाऊ शकता.

शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधरण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित सातूच्या सरबताचे सेवन करावे. हे सरबत आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. याशिवाय यामध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक ठरतात. एक ग्लास पाण्यात सातूचे पीठ घेऊन मिक्स करावे. हे सरबत लहान मुलांना नियमित पिण्यास दिल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील.

दैनंदिन आहारात तूप, साय, लोणी, ताक, पनीर, खीर इत्यादी द्रव पदार्थांचे भरपूर प्रमाणात सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. थंड पदार्थ शरीरातील उष्णता कमी करून पोटात गारवा निर्माण करतात. त्यामुळे रोजच्या आहारात नेहमी दही खावे. याशिवाय काकडी, बीट, गाजर इत्यादी पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील.

उष्णतेमुळे अंगाची काहिली होते? शरीर थंड ठेवण्यासाठी नियमित करा ‘या’ रसाचे सेवन, राहाल कायम फ्रेश आणि ताजे

हंगामी फळांचे किंवा भाज्यांचे सेवन आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असते. या फळांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात.आंबा, केळी, कलिंगड,अननस, फणस, जांभूळ, करवंद, बोर, चिंचा, आवळा, चिकू इत्यादी फळांचे रोजच्या आहारात सेवन करावे. याशिवाय आहारात डाळ, भात, कढी, पालेभाज्या, टोमॅटो इत्यादी विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Consume these foods in your diet to improve the bodys weakened immunity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 09:47 AM

Topics:  

  • summer care tips
  • Summer Food
  • summer heat

संबंधित बातम्या

उन्हाळी डेझर्ट! थंडगार पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा नैसर्गिक गोडवा असलेले शहाळ्याचे आईस्क्रीम
1

उन्हाळी डेझर्ट! थंडगार पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा नैसर्गिक गोडवा असलेले शहाळ्याचे आईस्क्रीम

Heat Stroke: वाढत्या उन्हाळ्यात कोणत्याही क्षणी हिट स्ट्रोकने जाईल जीव, उष्माघातापासून बचाव करण्यासाठी अशी घ्या काळजी
2

Heat Stroke: वाढत्या उन्हाळ्यात कोणत्याही क्षणी हिट स्ट्रोकने जाईल जीव, उष्माघातापासून बचाव करण्यासाठी अशी घ्या काळजी

जेवणानंतर नियमित प्या ‘या’ हिरव्या पानांचा चहा, पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे
3

जेवणानंतर नियमित प्या ‘या’ हिरव्या पानांचा चहा, पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे

वाढत्या उन्हामुळे अस्वस्थपणा जाणवतोय? शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
4

वाढत्या उन्हामुळे अस्वस्थपणा जाणवतोय? शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.