दिवसाची सुरुवात करा 'या' आयुर्वेदिक नियमांप्रमाणे, शंभर वर्षांपेक्षा जास्त जगाल आयुष्य
सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात आनंदी आणि प्रसन्न जावी असे नेहमीच सगळ्यांचं वाटत असते. सकाळी उठल्यानंतर बरेच जण नाश्ता न करता कामानिमित्त बाहेर पडून जातात. याशिवाय व्यायाम न करणे, चुकीचा आहार, शारीरिक मानसिक तणाव, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. या चुकीच्या सवयी शरीरातील वाढणाऱ्या मोठ्या आजारांचे कारण बनतात. त्यामुळे दीर्घकाळ आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी चुकीच्या सवयी फॉलो न करता शरीरासाठी योग्य असलेल्या सवयींचा अवलंब करावा. चुकीच्या सवयी मानवी आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात.(फोटो सौजन्य – iStock)
आयुर्वेदामध्ये जीवन जगण्याचे अनेक महत्वपूर्ण सल्ले देण्यात आले आहेत. जीवन जगताना आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये इत्यादी अनेक गोष्टींबद्दल आयुर्वेदामध्ये माहिती देण्यात आली आहे. याशिवाय आयुर्वेदाला आरोग्याचा खजिना असे मानले जाते. आयुर्वेद निरोगी आरोग्याचे सिक्रेट आहे. शरीर नैसर्गिक पद्धतीने कसे स्वच्छ करावे, निरोगी आरोग्यासाठी नेमके काय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आली आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कायम फ्रेश आणि निरोगी राहण्यासाठी कोणत्या सवयी फॉलो कराव्यात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
दिवसभरात वेगवेगळ्या अन्नपदार्थांचे सेवन केले जाते. अन्नपदार्थांचे सेवन केल्यानंतर शरीरात गेलेल्या अन्नपदार्थांमधील आवश्यक घटक आतड्या शोषून घेतात आणि विषारी पदार्थ शरीरात तसेच साचून राहतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिऊन टॉयलेटला जावे.
सकाळी उठल्यानंतर जीभ करणे आवश्यक आहे. जीभ स्वच्छ करताना हळूहळू जिभेवर ब्रश फिरवावा. याशिवाय बोटांच्या मदतीने दात स्वच्छ करावे. नियमित जीभ स्वच्छ केल्यामुळे इंटरनल ऑर्गन चांगले राहतात आणि शरीराची पचनक्रिया निरोगी राहते. सकाळी उठल्यानंतर जीभ नियमित स्वच्छ केल्यास जिभेवर साचून राहिलेली डेड स्किन निघून जाते.
डोक्याची मालिश केल्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. याशिवाय केस गळतीची समस्या कमी होऊन तात्काळ आराम मिळतो. वारंवार डोकं दुखीची समस्या उद्भवू लागल्यास खोबऱ्याच्या तेलाने डोक्यावर मालिश करावी. यामुळे मानसिक तणाव कमी होऊन मन शांत राहील. डोकेदुखी, टक्कल पडणे, केसगळती इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळतो.
वाढलेले वजन कमी करताना आहारात करा ‘या’ पिवळ्या फळाचे सेवन, वजन कमी होण्यासोबत पचनक्रिया राहील मजबूत
सकाळी उठल्यानंतर नियमित व्यायाम, ध्यान किंवा प्राणायाम करणे आवश्यक आहे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. आयुर्वेदानुसार सकाळी उठल्यानंतर नियमित व्यायाम आणि सूर्यनमस्कार केल्यास शरीर कायम निरोगी आणि फ्रेश राहील. आरोग्यासंबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही. व्यायाम केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो.