
शरीरात सतत थकवा,अशक्तपपणा जाणवतो? रोजच्या आहारात नियमित करा 'या' भाज्यांचे सेवन
उन्हाळा ऋतू फारसा कोणालाच आवडतं नाही. कारण सतत येणाऱ्या घामाच्या धारांमुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. कडक उन्हाळ्यात बाहेर जाऊन आल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसू लागतात. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, पचनक्रिया बिघडणे, थकवा, अशक्तपणा इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर सतत अशक्तपणा, थकवा जाणवू लागतो. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराला जास्त थंडावा देण्याऱ्या पदार्थांचे आणि भरपूर पाण्याचे सेवन करावे. यामुळे आरोग्य सुधारते. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता काहीवेळा जीवावर बेतण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – iStock)
पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात उन्हाळ्यात मिळणाऱ्या भाज्या आणि फळांच्ये नियमित सेवन करावे. या भाज्या आणि फळे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक ठरतात. फळे खाल्यामुळे शरीर ताजेतवाने राहते. याशिवाय पाण्याची कमतरता भरून निघते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात निर्माण झालेल्या पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात कोणत्या भाज्या आणि फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या भाज्या, फळांमध्ये भरपूर पाणी आढळून येते.
उन्हाळा वाढल्यानंतर बाजारात कलिंगड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. कलिंगडमध्ये ९० टक्के पाणी असते. त्यामुळे कलिंगड खाल्यानंतर शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून निघते. याशिवाय कलिंगडमध्ये फायबर, विटामिन सी, विटामिन ए, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडेंट लाइकोपीन इत्यादी अनेक घटक आढळून येतात. स्ट्रोक, कर्करोग इत्यादी गंभीर आजारांपासून त्रस्त असलेल्या लोकांनी रोजच्या आहारात नियमित कलिंगड खावे. उन्हाळ्यात कायम फ्रेश राहण्यासाठी कलिंगडचे सेवन करावे.
काकडी खाल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी नियमित जेवताना काकडी खावी. काकडी खाल्यामुळे शरीरात कायम थंडावा टिकून राहतो. तसेच काकडीपासून तुम्ही रायता, कोशिंबीर, काकडी सँडविच, सॅलड इत्यादी अनेक पदार्थ बनवू शकता. यामध्ये विटामिन के, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात.
दैनंदिन आहारात टोमॅटोचे सेवन केले जाते. टोमॅटो खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. जीवनसत्त्वे-ए, बी -2, सी, फॉलेट, क्रोमियम, फायबर, पोटॅशियम आणि फायटोकेमिकल्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. कर्करोग, ऑटोम्यून्यून डिसऑर्डर आणि हृदयरोग इत्यादी गंभीर आजारांपासून त्रस्त असलेल्या लोकांनी रोजच्या आहारात टोमॅटोचे सेवन करावे. टोमॅटो खाल्यामुळे शरीरात होणारी जळजळ कमी होईल आणि शरीर थंड राहील.