पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजच्या आहारात नियमित करतात 'या' हिरव्या भाजीचे सेवन
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वयाच्या ७४ व्या वर्षीसुद्धा कायम फिट आणि तरुण आहेत. शरीर फिट आणि निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या आहारात पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. जीवनशैलीतील बदल, आहारात होणारे बदल, पचनाची समस्या, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे शरीरातील कॅल्शियम कमी होणे, पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा अभाव शरीरात जाणवू लागतो. अशावेळी शरीराची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. सांधेदुखी किंवा कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करतात. मात्र असे न करता शरीरासाठी आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – iStock)
बाजारामध्ये शेवग्याच्या शेंगा सहज उपलब्ध होतात. याशिवाय शेवग्याच्या पानांची भाजी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. या भाजीमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, लोह, अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. या शेवग्याच्या भाजीचे नियमित सेवन केल्यास सांधेदुखीच्या समस्येपासून आराम मिळेल. याशिवाय शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होईल. नरेंद्र मोदी रोजच्या आहारात शेवग्याच्या भाजीचे सेवन करतात. या भाजीचे सेवन केल्यामुळे ते वयाच्या ७४ व्या वर्षीसुद्धा कायम फिट आहेत. आज आम्ही तुम्हाला शेवग्याच्या भाजीचे सेवन केल्यामुळे आरोग्याला कोणते फायदे होतात? याबद्दल जाणून घ्या सविस्तर माहिती.
हाडे मजबूत राहण्यासाठी रोजच्या आहारात शेवग्याच्या शेंगांचे किंवा शेवग्याच्या भाजीचे सेवन करावे. या भाजीच्या सेवनामुळे शरीराला कॅल्शियम मिळते आणि सांधे दुखीच्या समस्यांपासून आराम मिळतो. या भाजीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस इत्यादी घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. वारंवार हाडांमधील वेदना वाढू लागल्यास आहारात शेवग्याच्या भाजीचे सेवन करावे. यामुळे हाडांमधील वेदना कमी होतील.
शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता आणि रक्त शुद्ध करण्यासाठी शेवग्याची भाजी प्रभावी ठरते. रक्तामध्ये साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. त्यामुळे नियमित शेवग्याच्या भाजीचे किंवा शेंगांचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. शरीरातील रक्त शुद्ध होऊन हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होईल.
बऱ्याचदा आहारात तेलकट किंवा मसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे बद्धकोष्ठता किंवा पचनसंबंधित समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित शेवग्याच्या भाजीचे किंवा शेवग्याच्या शेंगांचे सेवन करावे. यामुळे शरीराला फायदे होतील. याशिवाय शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील.