रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढून टाकतील 'हे' नाश्त्यातील पदार्थ
दैनंदिन आहारात तेलकट किंवा अतितिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरात होणाऱ्या बदलांकडे बऱ्याचदा योग्य लक्ष दिले जात नाही. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल, मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा आरोग्यासंबंधित इतर समस्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात. त्यामुळे दैनंदिन आहारात शरीराला पचन होणाऱ्या पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. शरीरात खराब कोलेस्ट्रॉल साचून राहिल्यानंतर हृदयाच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. यामुळे काहीवेळा शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात वाढलेल्या खराब कोलेस्ट्रॉलची पाटलाकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.(फोटो सौजन्य – iStock)
शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल, दुसरे म्हणजे खराब कोलेस्ट्रॉल. चांगले कोलेस्ट्रॉल शरीरात निरोगी पेशी तयार करते, तर खराब कोलेस्ट्रॉलची पातळी रक्तवाहिन्यांना इजा पोहचवते. खराब कोलेस्ट्रॉल संपूर्ण शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिल्यानंतर हृदयाच्या रक्तप्रवाहात अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल बाहेर पडून जाणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाल शरीरात साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढून टाकण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
कढीपत्ता आणि पुदिन्याच्या पानांपासून तयार केलेली हिरवी चटणी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या चटणीच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात, ज्यामुळे संपूर्ण शरीर स्वच्छ होते. हिरव्या चटणीचे सेवन तुम्ही कोणत्याही पदार्थांसोबत करू शकता. या चटणीमध्ये असलेले फायबर शरीरातील घाण बाहेर काढून टाकतो.
सकाळच्या नाश्त्यात मोड आलेले कडधान्य खाल्यास लवकर भूक लागणार नाही. यामध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये कांदा, टोमॅटो, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून खाल्यास शरीरात जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधरण्यास मदत होईल. यामध्ये फायबर आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर आढळून येते. अधिक प्रमाणात शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मोड आलेल्या कडधान्यांचे सेवन करावे.
पालक खिचडी सकाळच्या नाश्त्यात खाल्यास दीर्घकाळ पोट भरलेले राहील आणि लवकर भूक लागणार नाही. आरोग्याच्या दृष्टीने पालक अतिशय पौष्टिक आहे. पालक खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले फायबर शरीरातील घाण स्वच्छ करते. शरीरात साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी पालक खिचडी खावी.पालकमध्ये भरपूर पोषक घटक आढळून येतात.