इतके रंग असूनही विमानांना फक्त पांढरा रंगच का दिला जातो? सुंदरता नाही तर यामागे दडलं आहे वैज्ञानिक कारण
आजच्या काळात कदाचितच असा कोणी असेल, ज्याने आजवर हवाई प्रवास केला नसेल. जेव्हा आपण विमानात बसतो किंवा ते आकाशात उडताना पाहतो, तेव्हा एक गोष्ट हमखास डोक्यात येते, ती म्हणजे विमानाचा रंग. तुम्ही कोणत्याही देशाचे विमान पाहिले तरी, जवळपास सर्वच विमाने पांढऱ्या रंगाचीच असतात. मग ते छोटे असोत की मोठे. पण नेहमीच पांढऱ्या रंगाचा वापर का केला जातो? हे फक्त सौंदर्यासाठी आहे की यामागे काही विशेष कारणं आहेत खरंतर आपण याकडे फारसे लक्ष देत नाही, पण विमानाचा रंग नेहमी पांढराच का असतो यामागे काही वैज्ञानिक आणि तांत्रिक कारणं आहेत. अनेकांना वाटतं की विमान कंपन्या आपल्या आवडीप्रमाणे रंग निवडतात, पण पांढरा रंग निवडण्यामागे काही ठोस कारणं असतात.
बिघाड किंवा खरोंच सहज लक्षात येतात
विमान जरी बाहेरून मोठं आणि मजबूत दिसत असलं तरी ते अत्यंत संवेदनशील असतं. जर त्यात कुठेही लहानशी तक्रार, तडा किंवा नुकसान झालं, तर ते त्वरीत दुरुस्त करणं अत्यावश्यक असतं. पांढऱ्या रंगावर कोणतीही खरोंच, डेंट किंवा गडबड लगेच दिसते. त्यामुळे तपासणी आणि देखभाल सोपी होते.
आकाशात सहज ट्रॅक करता येतं
पांढरा रंग हा आकाशात इतर कोणत्याही रंगांपेक्षा सहजपणे दिसतो. त्यामुळे विमान ट्रॅक करणं सोपं जातं. विमानाच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हे खूप महत्त्वाचं ठरतं. विमानात काही बिघाड झाल्यास तो लगेच लक्षात येतो.
तापमानावर नियंत्रण
पांढरा रंग सूर्यप्रकाश परावर्तित करतो, त्यामुळे विमानाचे बाह्य तापमान नियंत्रणात राहतं. गडद रंग उष्णता शोषतो आणि त्यामुळे विमानात गरमी वाढू शकते. परंतु पांढऱ्या रंगामुळे विमानात थोडीशी थंडक राहते, जे प्रवाशांसाठी अधिक आरामदायक असते.
वजन कमी ठेवण्यासाठी
हे एक आश्चर्यकारक पण महत्त्वाचं कारण आहे. पांढरा रंग हलकं असतो, कारण गडद रंगांच्या तुलनेत त्याचा पेंट कमी वजनाचा असतो. जर विमानावर गडद रंग लावला गेला, तर त्याचे वजन सुमारे ८ प्रवाशांच्या वजनाइतकं वाढू शकतं. विमान जितकं हलकं, तितकी इंधनाची बचत होऊ शकते.
अंधारातसुद्धा स्पष्ट दिसतो
पांढरा रंग अंधारातसुद्धा चांगला दिसतो. शिवाय, तो लवकर फिका पडत नाही. त्यामुळे विमान बराच काळ नीट आणि स्वच्छ दिसतं. पांढरा रंग केवळ सौंदर्यासाठी नाही, तर त्यामागे तपासणी सुलभ होणे, कमी तापमान, सुरक्षितता, वजन नियंत्रण, आणि दीर्घकाळ टिकणं अशी अनेक कारणं आहेत. म्हणूनच जगभरातील बहुतांश विमाने पांढऱ्या रंगाची असतात.