यकृताच्या निरोगी आरोग्यासाठी ही पेय प्यावीत
जीवनशैलीतील बदलांचे परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतात. बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, सतत बाहेरचे पदार्थ खाणे, दारूचे सेवन करणे इत्यादी अनेक कारणांमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक आजार अंगावर काढतात. पण हेच आजार पुढे जाऊन मोठे स्वरूप घेतात.मानवी शरीरातील मुख्य अवयव म्हणजे यकृत. यकृत हा एक अवयव नसून शरीरातील एक ग्रंथी आहे. त्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्याचे काम करतो. तसेच पचनक्रिया सुधारणे, जुन्या लाल पेशी काढून टाकणे, कोलेस्टेरॉल बनवणे इत्यादी महत्वपूर्ण कार्य यकृत करते.
अनेकदा यकृतासंबंधित समस्या उद्भवल्यानंतर अनेक लोक फॅटी ऍसिडची समस्या असावी असे म्हणून आजारांपण अंगावर काढतात. पण असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे यकृताची काळजी घेऊन आरोग्याची सुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी अनेक शरीर डिटॉक्स होण्यासाठी कोणत्या ड्रिंक्सचा आहारात समावेश करावा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: 7 दिवस रिकाम्या पोटी खा चिमूटभर काळी मिरी, फायदेच फायदे
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे शरीराला आवश्यक असेल तेवढे पाणी पिणे गरजेचे आहे. शरीर डिटॉक्स करण्यासाठी पाणी उत्तम पर्याय आहे. त्यामुळे दिवसभरात कमीत कमि लीटर पाणी प्यावे. मुबलक प्रमाणात पाण्याचे सेवन केल्यामुळे यकृत निरोगी राहूनआरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो.
कॉफीचे सेवन केल्यामुळे यकृताचे नुकसान होत नाही. त्यामुळे रोजच्या आहारात कॉफीचे सेवन करणे आवश्यक आहे. कॉफीचे सेवन केल्यामुळे सिरोसिसचा धोका कमी होऊन आरोग्य सुधारते. तसेच कॉफीमध्ये असलेले केफिन आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्याचे काम लिंबू पाणी करते. तसेच यामुळे शरीराला सुद्धा अनेक फायदे होतात. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी रोज सकाळी उठल्यानंतर लिंबू पाण्याचे सेवन करावे.
हे देखील वाचा: हार्ट अटॅक आल्यावर मोठ मोठ्याने खोकून आपला प्राण वाचू शकतो? जाणून घ्या सत्य
लोहयुक्त बीटचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. बीटरूटमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात बीटरूटच्या रसाचे सेवन करावे. शरीरात कमी झालेले रक्त भरून काढण्यासाठी नियमित बीटरूट खावे.