Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आतड्यांमध्ये कुजलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित खा ‘ही’ फळे, सकाळी जोर न लावता पोट होईल स्वच्छ

शरीरात वाढलेल्या बद्धकोष्ठतेचा परिणाम संपूर्ण पचनक्रियेवर लगेच दिसून येतो. यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्याऐवजी आतड्यांमधील तशीच साचून राहते. आतडे स्वच्छ करण्यासाठी नियमित खा ही फळे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 11, 2026 | 05:30 AM
आतड्यांमध्ये कुजलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित खा 'ही' फळे, सकाळी जोर न लावता पोट होईल स्वच्छ

आतड्यांमध्ये कुजलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित खा 'ही' फळे, सकाळी जोर न लावता पोट होईल स्वच्छ

Follow Us
Follow Us:

आतडे स्वच्छ करण्यासाठी उपाय?
बद्धकोष्ठतेची कारणे?
पचनक्रिया सुधारण्यासाठी घरगुती उपाय?

सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यास संपूर्ण दिवस कंटाळवाणा आणि चिडचिडा जातो. शरीरात साचून राहिलेल्या घाणीमुळे आरोग्य बिघडून जाते. बऱ्याचदा सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होण्यासाठी खूप जास्त जोर लावावा लागतो. पण तरीसुद्धा पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही. आतड्यांमध्ये जमा झालेल्या घाणीमुळे ऍसिडिटी, गॅस, अपचन आणि पोटाचे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. तसेच आतड्यांमध्ये चिकटलेल्या घाणीमुळे पोटाच्या डाव्या बाजूला काहीवेळा वेदना होतात. बद्धकोष्ठता झाल्यानंतर काहीवेळा मूळव्याध सुद्धा होतो. त्यामुळे शौचातुन रक्त पडणे किंवा मूळव्याध होऊन शरीराच्या आतील भागाला सूज येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये चिकटलेला विषारी मल बाहेर काढून टाकण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

‘अ‍ॅक्टरेक’च्या प्रोटॉन थेरपीचा कर्करुग्णांना दिलासा! आतापर्यंत एकूण ९०० रुग्णांवर उपचार, ४०० हून अधिक लहान मुलांचा समावेश

किवी:

किवी हे फळ किमतीने अतिशय महाग आहे. पण बद्धकोष्ठतेवर अतिशय रामबाण मानले जाते. यामध्ये असलेले ॲक्टिनिडिन नावाचे एक नैसर्गिक एन्झाइम आढळून येते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. शरीराची पचनक्रिया वेगाने करण्यासाठी किवीचे सेवन करावे. कीवीमध्ये विरघळणारे फायबर मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्यांमधील मल मऊ होऊन सहज बाहेर पडून जातो. ज्यामुळे पोट स्वच्छ होण्यास मदत होते. जुनाट बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी किवी खावी.

पेरू:

आंबटगोड चवीचा पेरू विटामिनचा महत्वपूर्ण स्रोत मानला जातो. हे फळ लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. सकाळच्या नाश्त्यात नियमित एक पेरू खाल्ल्यास पोट सुद्धा भरलेले राहील आणि आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते. यामध्ये असलेले फायबर आतड्यांमधील मल सहज बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. पेरू खाताना त्यातील बिया अजिबात फेकून देऊ नका. बिया खाल्ल्यामुळे शरीराला महत्वपूर्ण फायदे होतात. नियमित एक पेरू खाल्ल्यास पोट स्वच्छ होईल.

लघवी दीर्घकाळ थांबवून ठेवल्यामुळे किडनी-मूत्राशयावर होतो गंभीर परिणाम! इन्फेक्शन रोखण्यासाठी करा ‘हे’ उपाय

पपई:

आठवड्यातून दोनदा सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी पपईचे सेवन करावे. पपई खाल्ल्यामुळे अन्नातील प्रथिनांचे पचन सुधारण्यास मदत होते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात. पपईमध्ये असलेले पेपेन नावाचे पाचक एन्झाइम आणि फायबर आतड्यांमधील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. यासोबतच दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे आणि फळांचे सेवन करावे. अन्न पदार्थ सहज पचन होण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाणी प्यायल्यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अस्वस्थ आतड्याची लक्षणे कोणती?

    Ans: सतत पोट फुगणे, गॅस किंवा बद्धकोष्ठता.

  • Que: आतड्याचे आरोग्य सुधारण्यासाठी काय खावे?

    Ans: फळे, भाज्या, कडधान्ये आणि संपूर्ण धान्य.

  • Que: आतड्याचे आरोग्य खराब होण्याची कारणे काय?

    Ans: अतिप्रमाणात साखर, कमी फायबर असलेला आहार, मानसिक ताण, अपुरी झोप आणि अँटीबायोटिक्सचा अतिवापर यामुळे आतड्याचे आरोग्य खराब होऊ शकते.

Web Title: Eat these fruits regularly to flush out toxins from the intestines clean bowel movements without straining in the morning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Digestion Problem
  • gut health
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

World Hepatitis Day: हिपॅटायटिसविरोधात जनजागृती; रेडक्लिफ लॅब्सकडून मुंबईभर मोफत तपासणी शिबिरांचे आयोजन
1

World Hepatitis Day: हिपॅटायटिसविरोधात जनजागृती; रेडक्लिफ लॅब्सकडून मुंबईभर मोफत तपासणी शिबिरांचे आयोजन

Swollen Feet: पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करणं पडेल महागात! असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा इशारा
2

Swollen Feet: पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करणं पडेल महागात! असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा इशारा

World IVF Day: दैनंदिन सवयी प्रजननक्षमतेवर कसा परिणाम करतात? पालकत्वाचे स्वप्न साकारण्यासाठी जीवनशैलीत करा बदल
3

World IVF Day: दैनंदिन सवयी प्रजननक्षमतेवर कसा परिणाम करतात? पालकत्वाचे स्वप्न साकारण्यासाठी जीवनशैलीत करा बदल

स्वयंपाकघरातील ‘सोनं’ ठरते कच्ची हळद! नियमित सेवनाने शरीराला होतील भरमसाट फायदे
4

स्वयंपाकघरातील ‘सोनं’ ठरते कच्ची हळद! नियमित सेवनाने शरीराला होतील भरमसाट फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.