Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लघवी दीर्घकाळ थांबवून ठेवल्यामुळे किडनी-मूत्राशयावर होतो गंभीर परिणाम! इन्फेक्शन रोखण्यासाठी करा ‘हे’ उपाय

वारंवार लघवी रोखून धरल्यामुळे किडनी आणि मूत्राशयात इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे लघवी जास्त वेळ रोखून धरू नये.अन्यथा किडनीसंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 10, 2026 | 08:38 AM
लघवी दीर्घकाळ थांबवून ठेवल्यामुळे किडनी-मूत्राशयावर होतो गंभीर परिणाम! इन्फेक्शन रोखण्यासाठी करा 'हे' उपाय

लघवी दीर्घकाळ थांबवून ठेवल्यामुळे किडनी-मूत्राशयावर होतो गंभीर परिणाम! इन्फेक्शन रोखण्यासाठी करा 'हे' उपाय

Follow Us
Follow Us:

लघवीमध्ये इन्फेक्शन का वाढते?
मुत्राशयातील इन्फेक्शन रोखण्यासाठी उपाय?
युटीआय इन्फेक्शनची लक्षणे?

शरीरातील विषारी घटक घाम, लघवी आणि शौचावाटे बाहेर पडून जाते. पण बऱ्याचदा जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, तासनतास एका जागेवर बसून राहणे, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. आपल्यातील अनेकांना तासनतास लघवी रोखून धरण्याची सवय असते. पण लघवी रोखून धरल्यामुळे शरीरातील विषारी घाण बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तशीच साचून राहते. ज्याच्या परिणामामुळे किडनी आणि मूत्राशयात इन्फेक्शन वाढते. किडनी निकामी झाल्यानंतर शरीरातील रक्त शुद्ध होत नाही, ज्यामुळे अंगाला खाज येणे, चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे वेळीच लघवीला जाणे आवश्यक आहे. जास्त वेळ लघवी थांबवून ठेवल्यामुळे मूत्रमार्गाचा संसर्ग, किडनी स्टोन, मूत्राशय कमकुवत होणे आणि किडनीवर जास्तीचा तणाव येतो. त्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवतात.(फोटो सौजन्य – istock)

रमजान दरम्यान शरीरात वाढू शकते हायड्रेशनची समस्या! जाणून घ्या युरोलॉजिस्ट डॉक्टरांनी दिलेली सविस्तर माहिती

मानवी शरीरातील मूत्राशय साधारणपणे ३५० ते ५०० मिली लघवी साठवू शकते. पण ज्यावेळी मूत्राशय पूर्णपणे भरले जाते, तेव्हा मेंदूला लघवीला जाण्याचे संकेत दिले जातात. पण वेळीच लघवीला न गेल्यामुळे मूत्राशयाचे स्नायू कमकुवत होतात आणि शरीरातील विषारी घटक रक्तामध्ये पुन्हा एकदा शोषून घेतले जातात. लघवी रोखून धरणे म्हणजे शरीरातील घाणेरडे आणि विषारी घटक पुन्हा एकदा तसेच साठवून ठेवणे. चुकीच्या सवयींमुळे हळूहळू शरीर आतून कमकुवत होऊन जाते. त्यामुळे वेळीच लघवीला जाणे आवश्यक आहे.

मूत्राशयाच्या संसर्गाची कारणे आणि लक्षणे:

जास्त वेळ लघवी रोखून धरल्यामुळे सगळ्यात गंभीर आजार म्हणजे युटीआय संसर्ग होतो. युटीआय संसर्ग झाल्यानंतर मूत्राशयात वेगाने हानिकारक विषाणू वाढू लागतात. कामाचा ताण, प्रवास किंवा सार्वजनिक स्वच्छतागृहचा वापर केल्यामुळे युटीआय इन्फेक्शन वाढते. पण अतिशय साध्या वाटणाऱ्या सवयी शरीराचे गंभीर नुकसान करतात. त्यामुळे युटीआय संसर्ग झाल्यानंतर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावे. युटीआय झाल्यानंतर लघवी करताना जळजळ होणे, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, किडनी स्टोन, मूत्राशय कमकुवत होणे, किडनीवर अतिरिक्त ताण येऊ शकतो, पोटात दुखणे, वारंवार लघवीला जावे लागणे यांसारखी गंभीर लक्षणे दिसू लागतात. लघवीत वाढलेल्या इन्फेक्शनकडे दुर्लक्ष केल्यास संसर्ग किडनीपर्यंत पोहचतो.

बिघडलेले हार्मोन्स नैसर्गिकरित्या होतील कंट्रोल! शरीरात दिसणाऱ्या थायरॉईडच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

मूत्राशयाचा संसर्ग होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी:

मूत्राशयात वाढलेला संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी नियमित भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होईल आणि संसर्गाचा धोका कमी होईल. याशिवाय नाजूक अवयवांच्या स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यावे. तसेच कमीत कमी प्रमाणात चहा कॉफीचे सेवन करावे. लघवीला जाण्याची इच्छा झाल्यास लघवी रोखून न धरता तातडीने लघवीला जावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: युरिन इन्फेक्शन का होते?

    Ans: बहुतेकदा आतड्यांमधील बॅक्टेरिया लघवीच्या मार्गात प्रवेश करतात तेव्हा हे संक्रमण होते.

  • Que: युरिन इन्फेक्शनची प्रमुख लक्षणे कोणती?

    Ans: लघवी करताना जळजळ किंवा वेदना होणे, वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होणे.

  • Que: हे इन्फेक्शन किती सामान्य आहे?

    Ans: हे संसर्गाचा दुसरा सर्वात सामान्य प्रकार आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांना याचा धोका जास्त असतो, कारण स्त्रियांचा मूत्रमार्ग पुरुषांपेक्षा लहान असतो.

Web Title: Retention of urine for a long time has a serious effect on the kidney bladder do these measures to prevent infection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • kidney damage
  • Kidney Health Tips

संबंधित बातम्या

health Care Tips: शिड्या चढताना कायमच दमल्यासारखे होते? वेदनांकडे दुर्लक्ष न करता वेळीच करा ‘या’ सवयींमध्ये बदल
1

health Care Tips: शिड्या चढताना कायमच दमल्यासारखे होते? वेदनांकडे दुर्लक्ष न करता वेळीच करा ‘या’ सवयींमध्ये बदल

Skin Care साठी गोकर्णाच्या फुलांचा चहा ठरेल फायदेशीर! चेहऱ्यावर महिनाभरात दिसेल नैसर्गिक चमक
2

Skin Care साठी गोकर्णाच्या फुलांचा चहा ठरेल फायदेशीर! चेहऱ्यावर महिनाभरात दिसेल नैसर्गिक चमक

Kidney Stone: मुतखडा पुन्हा होण्याची कारणे? जीवनशैलीत केलेल्या ‘या’ चुका शरीरासाठी ठरतात महाभयंकर, वेळीच करा बदल
3

Kidney Stone: मुतखडा पुन्हा होण्याची कारणे? जीवनशैलीत केलेल्या ‘या’ चुका शरीरासाठी ठरतात महाभयंकर, वेळीच करा बदल

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश
4

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.