Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diabetic Retinopathy: दिसतंय म्हणून डोळे निरोगी आहेत असं समजू नका! रेटिनाच्या आजाराचा धोका ओळखा

Diabetic Retinopathy: डोळे बाहेरून व्यवस्थित दिसत असले तरी डोळ्याच्या आतील रेटिनावर मधुमेहाचा परिणाम होऊ शकतो आणि सुरुवातीला त्याची लक्षणे जाणवत नसल्याचे लेखात सांगितले आहे. मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये रेटिनावर परिणाम होण्याला डायबेटिक रेटिनोपॅथी म्हटले जाते. लेखानुसार, शुगर अनेक वर्षांपासून असणे आणि ती नियंत्रणात नसणे यामुळे

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 29, 2026 | 06:30 PM
Diabetic Retinopathy (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Diabetic Retinopathy (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मधुमेहामुळे रेटिनावर परिणाम होऊ शकतो
  • मधुमेह असलेल्या व्यक्तींनी दरवर्षी रेटिनाची तपासणी करणे महत्त्वाचे
  • व्हिजन साथी’ कार्यक्रमातून WhatsApp वर मधुमेह
आपल्याला दिसतंय म्हणजे आपले डोळे एकदम ठीक आहेत असं आपण समजतो. पण हे पूर्ण खरं नाही. डोळ्याच्या आत मागच्या बाजूला एक पडदा असतो, त्याला रेटिना म्हणतात. तोच आपल्याला खरं तर दिसायला मदत करतो. बाहेरून डोळे चांगले दिसले तरी आतला हा पडदा खराब असू शकतो आणि आपल्याला कळत पण नाही. Diabetic Retinopathy:

आज भारतात मधुमेह म्हणजे शुगरचे पेशंट खूप वाढले. जवळपास १० कोटी लोकांना मधुमेह आहे. यातल्या १२ ते १६ टक्के लोकांच्या डोळ्याच्या रेटिनावर त्याचा परिणाम झाला आहे. याला डॉक्टर डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, नऊ पैंकी एका माणसाला शुगर आहे. आणि सहा पैकी एका शुगर असलेल्या माणसाच्या डोळ्याला त्रास सुरू झाला आहे. २५ पैकी एका माणसाची दृष्टी जायच्या मार्गावर आहे. अजून धक्कादायक गोष्ट म्हणजे ८ टक्के लोकांना शुगर आहे हे माहितीच नाही.

कोणतंही लक्षण दिसत नाही हाच मोठा धोका

या आजाराचं सगळ्यात वाईट काय असेल तर तो हळूहळू वाढतो आणि सुरुवातीला काहीच कळत नाही. दुखत नाही, दिसणं कमी होत नाही. माणसाला वाटतं सगळं ठीक आहे.८५ टक्के शुगर असलेल्या लोकांना हे माहितीच नसतं की शुगरमुळे डोळे जाऊ शकतात. त्यांनी कधीच रेटिनाची तपासणी केलेली नसते. जेव्हा डॉक्टरकडे जातात तेव्हा ४५ टक्के लोकांची दृष्टी खूप कमी झालेली असते. तेव्हा वेळ निघून गेलेली असते.ज्यांना जास्त वर्षांपासून शुगर आहे त्यांना तर जास्त धोका आहे. शुगर कंट्रोलमध्ये नसेल तर हा धोका अजून वाढतो.

देशाचं पण नुकसान होतंय

डोळे गेले की माणूस काम करू शकत नाही, शिकू शकत नाही. त्याचा परिणाम फक्त त्याच्यावर नाही तर त्याच्या घरावर आणि देशावर पण होतो. एका अंदाजानुसार डोळ्याच्या या आजारामुळे भारताचं दरवर्षी जवळपास ५० हजार कोटी रुपयांचं नुकसान होतं. कारण लोक काम करू शकत नाहीत.

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

मग काय करायचं?

एकच उपाय आहे दरवर्षी डोळ्यांची तपासणी. दिसतंय चांगलं म्हणून दुर्लक्ष करू नका. खास करून ज्यांना शुगर आहे त्यांनी तर दरवर्षी रेटिना चेक करायलाच पाहिजे.सरकारने पण याकडे लक्ष द्यायला पाहिजे. गावोगावी रेटिना तपासणीची मशीन असायला हवी. चांगले डॉक्टर हवेत. उपचार स्वस्त झाले पाहिजेत आणि विम्यात याचा समावेश झाला पाहिजे. शुगरच्या प्रत्येक कार्यक्रमात डोळे तपासणी पण केली पाहिजे.

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय

यासाठी आता एक चांगला कार्यक्रम सुरू झाला आहे – डॉ. करोबी लाहिरी, उपाध्यक्ष – विट्रिओ रेटिनल सोसायटी इंडिया आणि कन्सल्टंट, बॉम्बे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर ‘व्हिजन साथी’. हा देशभरातला कार्यक्रम आहे. यात QR कोड स्कॅन करून व्हॉट्सअपवर तुम्हाला १४ छोटे मेसेज येतात. त्या मेसेजमध्ये शुगरमुळे डोळ्याला काय होतं, तपासणी का महत्वाची आहे, उपचार कुठे घ्यायचा हे सगळं सोप्या भाषेत सांगितलं जातं. लोकांना माहिती मिळाली की ते वेळेवर डॉक्टरकडे जातात.

Web Title: Diabetic retinopathy diabetes retina checkup vision saathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • Diabetics
  • lifestlye tips
  • Marathi News

संबंधित बातम्या

US-Pakistan Relations : दहशतवादाबाबत सहानुभूती खपवून घेतली जाणार नाही; जयशंकरांचे अमेरिका-पाक संबंधांवर स्पष्ट भाष्य
1

US-Pakistan Relations : दहशतवादाबाबत सहानुभूती खपवून घेतली जाणार नाही; जयशंकरांचे अमेरिका-पाक संबंधांवर स्पष्ट भाष्य

Pooja Birari on Trolling: पूजा बिरारीच्या कामावर उठले प्रश्न; ‘बांदेकरांच्या प्रोडक्शन’च्या टोमण्यांवर अभिनेत्री म्हणाली…
2

Pooja Birari on Trolling: पूजा बिरारीच्या कामावर उठले प्रश्न; ‘बांदेकरांच्या प्रोडक्शन’च्या टोमण्यांवर अभिनेत्री म्हणाली…

Nagpur Protest : शिक्षकांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू
3

Nagpur Protest : शिक्षकांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू

Chandrapur News: ४० फुटांचा रस्ता सायंकाळी १५ फुटांवर; बंगाली कॅम्प चौकातील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, अतिक्रमणावर कारवाईची मागणी
4

Chandrapur News: ४० फुटांचा रस्ता सायंकाळी १५ फुटांवर; बंगाली कॅम्प चौकातील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, अतिक्रमणावर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.